पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1007

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुबळेपणा m, मूल्यन्यूनता f, अवनति f, -हास m. ४ geol. (पाण्याच्या प्रवाहाने किंवा इतर कारणांनी टेकड्या किंधा खडक यांची) झरण्याची-झिजण्याची क्रिया f, क्षरण क्रिया f. ५ biol. अपकृष्ट-ऱ्हासाची स्थिति f, गुणहीनत्व n. ६ physiol. वाढ खुंटणे n, क्षीण होणे n. Degra'ded a. खालच्या पदवीस आणलेला, पदच्युत, पदभ्रष्ट, पतित, मानच्युत. Degra'ding a. हलकेपणा आणणारा, इजतः खाज, अपयशाचा, बेअब्रूचा. Degra'dingly adv. N. B. Every man has a certain moral or social position and he is said to degrade himself when he falls below it. Degree (de-gre') [O. Fr. degre, degret, a step or rank-L. de, down & gradus, step. ] n. rank or station on life, position पदवी f, पायरी f, पद n,दर्जा m. २ पर्याय m, पायरी f. [ BY DEGREES पर्यायाने, क्रमशः, अंशतः.] ३ विस्तार m, मर्यादा f अंश m, पोशी m. [D. OF LATITUDE अक्षांश. D. OF LONGITUDE रेखांश m. ] ४ a certain distance or remove in the line of descent पिढी f; as, "A relation in the third or fourth D." ५ विश्वविद्यालयांतील पदवी f. ६ (परिघाचा ३६० वा) अंश m. ७ alg. घात. ८ (यंत्रावरील) अंशदर्शक रेषा-मात्रा f, अंश m, प्रमाणांक m. ९ mus. दोन रांगांमधील तफावत f-फेर m. Forbidden degrees शरीरसंबंधास वर्ज्य पिढ्या. To a great degree अतिशय, फारच. In the smallest degree अनूमात्र, लवमात्र, काडीमात्र, अंशमात्र. To advance by degrees पायरीपायरीने चढणे. To this degree इतपत, ह्या अंशापर्यंत, ह्या मर्यादेपर्यंत. Dehisce (de-his') [ L. dehiscere-L, de, down & hiscere (hiare), to gape.] v. i. to gope (बी बाहेर पडण्याकरितां बोंडे शेंगा वगैरे) शिरेवर फुटणे, स्फोटन हाेणे. Dehis'cence n. bot. (बी बाहेर पडण्याकरिता बोंडे शेंगा वगैरे) फुटणे n, स्फोट n. Dehis'cent a. bot. उकलणारे (शेंग, बोंड इ.), स्फुटनशील, फुटीर. Dehort ( de-hort') [L. delbortari-L. de & hortari, to urge, exhort.] v. t. (obs.) to urge to abstain or rsfrain, to dissuade निवारणार्थ-निवृत्यर्थ बुद्धिवाद m. सांगणे-उपदेश m. करणे, परावर्तनबुद्धि f. सांगणे, निवारणाेपदेश m. करणे, अमुक गोष्ट करू नको म्हणून उपदेश करणे. Dehorta'tion n. (R.) निवारर्णाथ उपदेश-आग्रह करणे, निवारणार्थ उपदेश m. Dehorta'tive, Dehorta'tory a. (R.) निवारणोपदेशाचा, निवारणाेपदेशात्मक, परावृत्त करणारा. Dehort'er n. Dehumanise (de hū'-ma-niz) (L. de & Humanise. ] v. t. to divest of human qualities (such as pity, tenderness, &c.) माणुसकीपासून ज्युत करणे, मनांतील कीव-कळवळा इ. नाहीशी करणे, माणुसकी नाहीशी करणे. Dehydrate (de-hi'drat) [L. de & Hydrate-Gr. hudros, water. ] v. t. chem. to deprive of water, to render free from water(रासायनिक कृतीने ) जलांश काढून घेणे,