Jump to content

पान:राज्यव्यवहारकोश.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ई )

 आतां वर जे मूळ उद्देशाविषयों लिहिलें त्यावरून ह्या कोशाची ही आवृत्ती काढण्यांत आमचाही आशय तसाच असेल असे कदाचित कोणाच्या मनांत येईल. परंतु वस्तुतः तशी गोष्ट नाहीं. मूळ उद्देशाहून अमचा आशय अगदी भिन्न आहे. कोशकारांचा उद्देश यवनी शब्दांचे उन्मूलन करून त्यांच्या जागीं संस्कृत शब्दांचें आरोपण करावें हा दिसतो. आमचा आशय यवनी शब्द जे यदृच्छेनें आज भाषेत सामील झालेले आहेत त्यांचे तसेच परिपोषण करून त्यांस फलद्रूप- तेस आणावें, ह्मणजे हलो जी त्यांची पायमाली व अव्हेर चालला आहे तो दूर होऊन ते जास्त प्रचारसंत यावे, असा आहे. हल्लीं युनिव्हासेंटींच्या परिक्षांमुळे संस्कृताचें प्राबल्य या देशांत बरेंच वृद्धिंगत होत असल्या कारणानें महाराष्ट्र भाषेत रूढ होऊन बसलेल्या यवनी शब्दांच्या स्थळी संस्कृत पर्यायांचा जो जिकडे तिकडे प्रयोग होत आहे, तो कमी व्हावा व या जुन्या यवनी वतनदारांच्या हक्कांचा मराठी भाषेच्या कैवाऱ्यांच्या न्यायासनापुढे पूर्ण विचार होऊन त्यांस न्याय मि- ळावा असा ही आवृत्ति काढण्यांत आमचा आशय आहे. ज्या काळी हा कोश निर्माण झाला त्या कालाच्या स्थितीहून हल्लींच्या कालची स्थिति अगदीं भिन्न आहे.ध्या काली स्वधर्माविषषों जी आस्था व स्वराज्य स्थापिण्याविषयीं जी उत्कंठा उत्पन्न झाली होती तिच्या अनुरोधानें तेव्हांचे लोक यवनी शब्दांचा उच्छेद करण्यास प्रवृत्त झाले ते ठीकच. परंतु सांप्रत अजाव्याघ्र सर्पनकुलादि सवें परस्पर वैरभाव सोडून जेथे स्वस्थपणे विहार करीत, अशा वशिष्ठाश्रमा सारखी आ. मच्या देशाची स्थिति झाली आहे. अशा स्थितीत मुसलमान लोक आमचे दुसमान आहेत असे म्हणणे जितके असमंजस होईल त्याच प्रमाणानें मुसलमानी किंवा फारशी शब्द आमचे भाषेतून काढून टाकावे हा विचारही असमंजसतेचाच सम- जावयाचा. ह्या काळी त्या शब्दांशीं दुजाभाव करण्यास