Jump to content

पान:राज्यव्यवहारकोश.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( इ )

ह्या सर्व गोष्टींवरून यवनी शब्दांचा उच्छेद करून गीर्वाण पर्याय त्यांच्या स्थळीं परिपाठांत यावे असाच हेतु कोशकारांचा असावा असे सिद्ध होते. कोश निर्माण झाल्यानंतर महाराजांचे इहलोकीं आणखीं कांहीं वर्षे वास्तव्य झालें असतें तर ह्या मूळ उद्देशाचा प्रभाव आणखीही आपले दृष्टीस पडला असता. परंतु हा कोश करविल्यावर थोडेच वर्षांत महाराज परलोकवासी झाले, आणि त्यांणी केलेल्या संकल्पांपैकी पुष्कळ तसेच्या तसेच राहिले त्याप्रमाणे हाही मागे पडला. त्यांच्या पश्चात् त्यांचे ज्येष्ठ चिरंजीवांस अशा गोष्टींची जरूर असल्याचें कोठें ऐकिवांत नाहीं. त्यांस त्यांचे कलुषे कबजी सांगतील ती पूर्वदिशा होती. कबजींचे ऐकून ह्मणा किंवा स्व- स्फूर्तीने ह्मणा, त्यांनी जुनीं माणसे ज्यांचे आंगांत शिवाजीच्या वेळीं स्वदेशाभिमान वगैरे जागृत झालेला होता तोही बहुतेक नाहींशी केलीं. कनिष्ठ चिरंजीव राजाराम यांचा सर्व काल धामधुमीत व पळापळींत जाऊन शेवटही त्यांतच झाला. पुढे शाहू राजे सिंहासनारूढ झाल्यानंतर अशा गोष्टींची व्यवस्था लागावयाची तो त्यांस दिल्लीपतीच्या घरीं यवनी शीक्षण मिळाल्यामुळे व यवनी दरबाराच्या थाटामाटानें त्यांचे डोळे दिपून गेले असल्यामुळे त्यांस जे जे यवनी प्रकार ते ते प्रिय होऊन बसले होते. ह्यामुळे भाषेत सामील झालेल्या यवनी शब्दांचें, निःसारण करण्याचे एकीकडेच राहून त्यांच्या कारकीर्दीत नवे यवनी शब्दही भाषेत सामील झाले. खेरीज त्यांच्या कारकीर्दीत मराठेशाहीचा जोर यवनांच्या सत्तेतील मुलखांत फार झाल्यामुळे जसे जसे यवनांशी प्रसंग जास्त येत चालले तसे तसे यवनी शब्दांस आमचे भाषेत सामलि होण्यास ज्यास्तच फावलें. व तेव्हांपासून यवनी शब्दांस फांटा देण्याचें जें मार्गे पडलें तें पडलेच.
 २. यवनी । शब्द पुढे आणखीं भाषेत आले अशाविषयों प्रमाण पाह ण्यास लांब जाणे नको. या कोशान न गुंफिलेले असे पुष्कळ पवनी शब्द मराठी ग्रंथांत व कोशात सांपडतात.