त्यांची आवड, रामदास, तुकाराम ह्यांच्या सारखे त्यांचे
गुरु - अशा गोष्टींचा क्षणभर विचार केला ह्मणजे " प्रौढ
आणि विद्वान अशा लोकांप्रमाणे बोलतां यावें ह्याकरितां
त्यांस अशा कोशाची जरूर होती असे मुळींच संभवत नाहीं.
ज्याचे बालपणापासून बहुतेक सर्व दिवस विद्वानांशी वागतां व
बोलतां गेले, तो साधारण कुळंबटाप्रमाणेच बोलत असे, असें
कल्पिणे - आणि तें पुनः शिवाजी राजासारख्या सुबुद्धिमान्
पुरुषाविषयीं- ह्मणजे फारसे सुसंगतिक दिसत नाहीं.शिव-
राजाचे वेळी ह्या सर्व महाराष्ट्र देशभर स्वधर्माविषयों व स्वदे-
शाविषयीं अभिमान, आणि परकीय लोकांविषयों व त्यांचे
धर्मांविषयों जो द्वेष जागृत झाला होता याजकडे लक्ष
पोंचविले ह्मणजे व कोणत्याही लोकांचे स्वराज्य झालें असतां
स्वभाषेचा प्रसार करण्याची जी त्यांची साहजिक प्रवृत्ति आज
हजारों वर्षांच्या इतिहासांत जिकडे तिकडे दृष्टीस पडते, ती
मनांत आणिली ह्मणजे; ह्या कोशाचा मूळ उद्देश निराळाच दिसूं
लागतो. मुसलमानांच्या प्राचल्यानें पुष्कळ फारशी, आरबी व
उडदु वगैरे शब्द मराठी भाषेंत मिसळून गेले होते, त्या यवनी
शब्दांच्या स्थळीं संस्कृत पर्याय योजून ते परिपाठांत आणण्याचा
ह्या कोशाचा मूळचा आशय दिसतो. राजश्री काशिनाथजीही
ह्मणतात कीं, " हा कोश शिवाजी राजाच्या वेळेस गृहस्था
व दरबारी लोक हौशीमें मुखपाठ करीत असत अशी दंतकथ
आहे. " खेरीज पेशवे वगैरे अष्टप्रधानांचीं व दुसरे किर
कोळ कामगारांची व कारखान्याची जुनी नांवें बदलून त्यांस
संस्कृत नांवें राज्याभिषेकाच्या वेळेसच योजिल्याचे आपण
इतिहासांत वाचितों व व्याप्रमाणे ती बरीच परिपाठांत आले-
लींही पहातों. तसेच महाराष्ट्र भाषेत येऊन पाहिजे
तसा दांडगावा करण्यास मुसलमानी शब्दांस या कालापासून
मोठा प्रतिबंध झाला असेंही इतिहसांतरी लेख सांपडात.
१. प्रस्तुतकाळच्या शिक्षणक्रमाचाही झोंक असाच आहे हैं येथें
सांगितले पाहिजे असे नाहीं.
पान:राज्यव्यवहारकोश.pdf/५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( आ )