१. हा कोश श्री• छत्रपति शिवाजी राजे भोसले यां-
च्या आज्ञेवरून वे० शा० सं० रा० रघुनाथ नारायण अध्वरी
पंडितराव यांणी रचिला. ह्याच्या रचनेचा काल सुमारें ई०
सन १६७५/७६ हे साल होय.
२. शिव छत्रपति यांचा स्वदेशाभिमान नेहमी जंग-
रूक असून त्यांनी स्वराज्य स्थापिलें- ह्या गोष्टी तर सुप्रसिध्द व
आहेत. परंतु अशा धामधुमीच्या व दंग्याच्या काळांतही त्यांणी
स्वदेशांतील लोकांत विद्येची अभिवृद्धि व्हावी व स्वभाषा
ऊर्जित अवस्थेस यावी ह्या गोष्टींकडे अगदींच लक्ष पोचविले
नाहीं असे नाहीं. यथाशक्ति व यथावकाश त्यांचा ह्या काम
उद्योग चालू होताच. दरवर्षी अमुक खुंडी धान्य अगर
अमुक पैका पोचक्षून व कधी कधीं इनामें देऊनही त्यांनी
लोकांकडून विद्याभ्यास करविला अशाविषय दाखले सांपड-
तात.स्वभाषेच्या सुधारणेच्या प्रयत्नाबद्दल तर हा कोश
प्रत्यक्ष साक्ष देत आहे. हा कोश त्याकाळी विद्यावृद्धी-
च्या व भाषेच्या संबंधाने जो यत्न व नौं खटपट तेव्हांच्या
समजुतीप्रमाणे सुरू होती त्यांचा एक अमोलिक दुर्मिळ अवशि-
ष्टांश उरला आहे असे ह्मणतां येईल.
३. प्रथम प्रकाशक काशिनाथ गंगाधरजी ह्मणतात,
"हा कोश शिवाजी राजानें स्वतां आपल्याला मराठी
भाषेचें ज्ञान प्रौढ आणि विद्वान लोकांप्रमाणे बोलतां येण्यासा-
रखें व्हावें येवढ्याकरितां मुद्दाम करविला. " काशिनाथजींस
कोशाच्या ह्या मूळ पीठिकेबद्दल कोठें प्रमाण मिळाले असेल
ते असो. ऐतिहासिक ग्रंथांत तर ह्याचा उल्लेख अस
ल्याचें कोठें आमच्या आढळांत नाहीं. शिवाय शिवाजी
राजांस बाळपणांपासून ब्राह्मणांचा सहवास, पुराण ऐकण्याची
पान:राज्यव्यवहारकोश.pdf/४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( अ )
उपोद्घात.