या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलवान नसून अधिक कमजोर आहेत. कारण त्यांच्या जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा फारच मर्यादित आहेत.याउलट,स्त्रियांना भावी आयुष्यात त्यांनी बजावयाच्या अनेकविध भूमिकांकरिता निसर्गानेच त्यांना जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा अधिक व्यापक दिलेल्या आहेत. बलात्काराचा पुरुषांचा व्यवहारातील अनुभव तसा विरळाच.याउलट,शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले.
(दै. लोकसत्ता दि. ६ फेब्रु. २०१३)
■
राखेखालचे निखारे / २०