विचारील की, प्रेक्षकाच्या ठिकाणी हा दोष निर्माण होण्याचे कारण काय ? तर ही मंडळी हे सांगू शकतात की, काव्यात व नाटकात जो शब्द अथवा अभिनयाचा वापर आहे, त्यामुळे हा दोष निर्माण होतो.
खरे म्हणजे हे नव्यांचे मत कोणत्याही रसिक आस्वादातून जन्म पावत नाही. ते तार्किकाच्या वादसभेत उपस्थित झालेले, असामान्य पांडित्य आहे. ह्या भूमिकेचे खरे सामर्थ्य अमिनवगुप्तांच्या विरोधी अविचल उभे राहण्यात आहे. खरोखरी अभिनवगुप्तांच्या अनुयायांना ह्या भूमिकेचे खंडन करता येणे शक्य दिसत नाही. कारण वाड्मयस्वादात, नाटयप्रत्ययात, निजत्वनिरास आवरणभंगामुळे आहे की नव्या आवरणाच्या उदयामुळे आहे, हे कोण कसे सांगणार ? एवढा गाभ्याचा मुद्दा सोडल्यास हे वेगळ्या बाजूने आरंभ होणारे अभिनवगुप्ताचेच प्रतिपादन आहे. आनंद विषयक वेदांतदर्शनाची भूमिका बरोबर आहे काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरावर, नव्यमत अधिक उचित की अभिनवगुप्त अधिक उचित, ह्याचा निर्णय लागणार आहे. हा निर्णय काव्यसमीक्षा देणार नसून तत्त्वज्ञान देणार आहे. लोल्लट असा बलशाली भूमिकेचा प्रवक्ता आहे.
अभिनवगुप्तांनी सविस्तरपणे विचारात घेतलेला दुसरा पक्ष शंकुकाचा आहे. सामान्यपणे आपण असे गृहीत धरतो की, शंकुकाने लोल्लटाचे खंडन केलेले आहे, त्याअर्थी शंकुकाची भूमिका लोल्लटाच्या विरोधी आहे. स्थूलपणे पाहता या गृहीतात अर्थ आहे. कारण लोल्लट-खंडनापासूनच शंकुक आरंभ करतो. पण सूक्ष्मपणे पाहिले तर शंकुकाची भूमिका निराळ्या आरंभ बिंदूपासून आरंभ होणारी भूमिका असली, लोल्लटापेक्षा निराळी भूमिका असली, तरी ती लोल्लटविरोधी भूमिका नाही, असे आढळून येते. लोल्लटाप्रमाणेच शंकुक, नाटय अनुकरणरूप मानतो. नटांना अनुकर्ते व नाटकीय प्रकृतींना अनुकार्य मानतो. त्याच्याही भूमिकेत अनुकार्याच्या ठिकाणी स्थायीभाव आहेत, त्यांची उत्पत्ती आहे. शंकुकाचा पक्ष सुद्धा लोल्लटाच्या पक्षाप्रमाणेच नाटय, सुखदुःखस्वरूपी द्विविध प्रत्यय देणारे आहे, असे मानणारा आहे. एका अर्थों हा लौकिकपक्ष आहे. पण लोल्लट शंकुकाच्या मधील साम्यस्थळे जितकी लक्षणीय आहेत, तितकेच त्यांच्यातील भेदही महत्त्वाचे आहेत.
लोल्लटपक्ष, हा प्राचीन परंपरेचा पक्ष आहे. काही शतके स्थिरपणे बहुमान्य राहिलेली ही भूमिका दिसते. सर्व प्रकारची खंडने पचवून नाटयदर्पणकारांच्यापर्यंत, किंबहुना परिवर्तित स्वरूपात जगन्नाथाच्यापर्यंत, हा पक्ष, पुनः पुन्हा उपस्थित होत राहिला. शंकुकाला अशी परंपरेची मान्यता दिसत नाही. नैय्यायिकांची भूमिका दर्शनक्षेत्रात कितीही महत्त्वाची ठरलेली असो, शंकुकाला फारसे अनुयायी मिळालेले दिसत नाहीत. पुढे चालून फक्त महिमभट्टाने त्याच्या भूमिकेचा काही प्रमाणात पुरस्कार केलेला दिसतो. कोणत्याही कालखंडात शंकुकाची भमिका बहुमान्य व
४३