पान:रससूत्र (Rasasutra).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकट होते, वाढत जाते. ह्या उपभावनांना संचारीभाव किंवा व्यभिचारी भाव म्हणतात. त्यासहच रोमांच, कंप, घाम येणे याही क्रिया घडतात; त्याला 'सात्विक भाव' म्हणतात. स्थायी भाव म्हणजे प्रमुख भावना, संचारी भाव म्हणजे उप-भावना, सात्विक भाव असे मिळून तीन भाव आहेत. सगळेच भाव मनात असतात. ते इतरांना कसे कळणार ? चेहऱ्यावरच्या हावभावांनी, शरीराच्या हालचालींनी. हे इतरांना कळतात. कुणाला न पटणारे आपण बोलू लागलो, की त्याच्या कपाळावर आठी दिसू लागते. ह्या शारीरिक क्रियांना अनुभाव म्हणतात. दुष्यंत-शकुंतलेच्या प्रेम प्रसंगात क्रमाने आपल्याला विभाव, अनुभाव, संचारीभाव दिसू लागतात. हे एकत्र आले म्हणजे त्याचा वाचक-प्रेक्षक ह्यांच्या मनावर परिणाम होतो (भावना उत्कटपणे जागृत होतात) हाच रस. नाट्यशास्त्रातील रस-सूत्राचा अर्थ हाच आहे. कृपया आपण लक्षात घ्या की ही संस्कृतची रसव्यवस्था नव्हे. रसांची कल्पना इतकी सरळसाधी नाही. केवळ आरंभासाठी म्हणून करून दिलेली प्राथमिक ओळख आहे. ही ओळख नुसती ढोबळच नाही तर ती पुष्कळशी त्रुटित. आणि विपर्यस्तही आहे, याची मला जाणीव आहे. पण ह्या ठिकाणाहून आपण रससूत्राकडे, जाऊ शकतो. ते प्रसिद्ध रस-सूत्र " तत्र विभाषानुभाव व्यभिचारी संयोगात् रसनिष्पत्तिः" असे आहे. त्या सूत्रात एकूण सात शब्द आहेत. ते सातही शब्द विवाद्य असून शिवाय दोन शब्दांचा येथे उल्लेख नाही. म्हणजे सूत्रातील सात शब्दांच्यामुळे नऊ वादग्रस्त प्रश्न उपस्थित झालेले आहेत. 'तत्र' या शब्दाचा अर्थ काय करावा ? नाटकात अभिनय करणाऱ्या नटाच्या ठिकाणी, मूळ व्यक्तींच्या ठिकाणी, कवींच्या ठिकाणी. नाट्यांतर्गत व्यक्ती म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी नाट्यप्रयोगात, की रसिक व्यक्तीच्या ठिकाणी; म्हणजे त्यांच्या मनात रस निष्पन्न होतो? ह्या सातपैकी रसनिष्पत्तीचे ठिकाण कोणते ? हा एक वाद आहे. पण प्रसिद्ध वेदांत्यांना हे मान्य नाही. ब्रह्मसूत्रात ज्याप्रमाणे पहिल्या सूत्रात आलेल्या 'अर्थ' शब्दाचा अर्थ येथून' असा करणे वेदात परंपरेला मान्य नाही त्याप्रमाणे 'तत्र' या शब्दाचा अर्थ 'त्या ठिकाणी' असा करणेही त्यांना मान्य नाही. वेदांत-परंपरा असे मानते की मागे नाट्यसंग्रहात रसाचा उल्लेख आलेला आहे. त्या संग्रहात आलेल्या विषयांच्यापैकी पहिला विषय 'रस'. तो क्रमाने विचार करण्यासाठी प्रथम घेतला आहे. म्हणून 'तत्र' शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी 'त्यातील' असा आहे. अभिनवगुप्तांनी आपल्या विवेचनाचा आरंभ "एवं क्रम हेतुमभिधाय" या शब्दांनी केलेला आहे. त्यातील खोचंं ही आहे.
 आलंबन विभाव, उद्दीपन विभाष आश्रयविभाव अशी विभागणी नाट्यशास्त्रात नाही. ही विभागणी औपचारिक आहे. असे अभिनवगुप्ताचे मत आहे. विभागाचे स्वरूप काय ? त्यांचे कार्य काय ? हाही वादविषय आहे. अनुभाव हे भाव समजायचे काय? अनुमाव व अभिनय ह्या कल्पनेतील नेमका फरक कोणता? अभिनय जर एकाच