पान:रससूत्र (Rasasutra).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिनवगुप्ताची भूमिका, कितीही मार्मिक व महत्त्वाची असली तरी ती अंतिम व निरपवाद आहे असेही मला वाटत नाही. ती भरत संमत भूमिका आहे, असेही दिसत नाही. सर्वोच्याच मतांना नाटयशास्त्रात आधार आहेत. सर्वोचीच मते काही ठिकाणी नाटयशास्त्राच्या विरोधी जातात. सर्वोच्याच मतात सत्याचा अंश आहे, असे मला दिसते. तिसऱ्या शतकातल्या संग्रद्दग्रंथांचे अकराव्या शतकातील भाष्य एकमेव , समर्थनीय भाष्य मानावे ही भूमिका मला श्रद्धाळूपणाची वाटते. नाटयशास्त्रासारखा प्रभावी आकरग्रंथ सगळ्या संस्कृत साहित्याच्या सुवर्णयुगात मार्गदर्शक होता. पण ह्या ग्रंथाचा जो अर्थ त्याकाळी कुणाला वाटला नाही, तोच त्याचा खरा अर्थ आहे व होता. ही भूमिका कमालीची भोळी म्हटली पाहिजे.
 खरे म्हणजे, भरतनाटयशास्त्र हा एकच ग्रंथ घेऊन मी माझे विचार मांडावेत. इतर कुणी काय प्रतिपादन केले आहे हा मुद्दा सोडूनच द्यावा. मलाही हे मत ग्राह्य वाटते. पण ही पद्धत फार असमाधानकारक आहे. ज्यांना इतर म्हणून आपण सोडून देऊ इच्छितो ते भरताचे भाष्यकार आहेत. ही मंडळी सहज बाजूला सरकणारी नाहीत. या भाष्यकारांनी लावलेला नाटयशास्त्राचा अर्थ ग्राह्य कुठवर आहे हे पाहाणेच भाग आहे. विशेषतः अभिनवगुप्तांनी नाटयशास्त्राचा अर्थ कसा लावला आहे हे जर आपण तपासणार नस तर मग भरताचे आपले आकलन, भारतीय परंपरेच्या संदर्भात अपुरे राहाणार आहे.
 सत्याचा एक भाग असा आहे, की संस्कृत काव्य नाटकांचे सुवर्णयुग अभिनवगुप्तांच्यापूर्वीच संपलेले आहे. काव्यशास्त्रात अभिनवगुप्तांची भमिका सर्वमान्य होण्यापूर्वीच्या काळात संस्कृतचे सर्व महाकवी व थोर नाटककार होऊन जातात. संस्कृत ललित वाड्मयावर अभिनवगुप्तांचा प्रभाव नगण्य आहे. कवींनी त्याची भूमिका नजरेसमोर ठेवून विचार केला नाही. समकालीन रसिकांच्या समोरही ही भूमिका नव्हती. पण ह्या सत्याचा दुसरा भागही तेवढाच महत्त्वाचा आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकानंतरचे सर्व काव्य नाटकावे टीकाकार प्रामुख्याने अभिनवगुप्तांना अनुसरतात. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या काळात भारतीयांनी आपल्याच प्राचीन वाङ्मयाकडे अभिनवगुप्तांच्या आधारे पाहिलेले आहे. सर्व भारतभर देशी भाषांच्यामधून जो वैभवशाली काव्याविष्कार झाला आहे त्याचा प्रमुख आधार अभिनवगुप्त आहे. मराठी साहित्याचे आश्रयस्थान जानवर है अभिनवगुप्त प्रभावाचे टळक उदाहरण आहे. शांत हा सर्वश्रेष्ठ रस असून तत्त्वज्ञान हा त्याचा स्थायी भाव आहे. हे सांंगणारा अभिनवगप्त नसता तर काव्याच्या रचनेसाठी ज्ञानेश्वरांनी गीताग्रंथाची निवडच केली नसती. खरे म्हणजे अभिनवगुप्त हा एक नुसता विचारवंत माणूम नव्हेच. काव्यशास्त्राच्या क्षेत्रात तो एका युगाच्या जाणिवांंचा प्रतिनिधी आहे. एखाद्या संस्कृतीला एक ग्रंथ शतकानुशतके मान्य