पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काकाजींचे पात्र मुळातच दुबळे- खरा संघर्ष दाखवलाच नाही- विजय कोणाचा?- विनोदाची जातकुळी कुठली?- सतीशचा विनोद- रोमँटिक पात्रे- आगळी व अनोळखी- विलक्षण वस्तू.

(८) कौंतेयच्या निमित्ताने / १२९ ते १३४
 लक्षवेधक तीन बाबी- कर्ण हा दलितांचा नेता- कर्णाचे अभिवचन हा दुर्योधनाचा विश्वासघात- आईविषयक पछाडलेपण- श्रीकृष्ण हा सर्वसामान्यांचा नेता- शिरवाडकरांचे राष्ट्रवादी मन- दुर्योधन हा परंपरागत कुलिनतेचा पुरस्कर्ता.

(९) हिमालयाची सावली / १३५ ते १६४
 कविता कादंबरीचा आस्वाद व नाटकाचा आस्वाद- असामान्यांच्या व्यक्तित्वाचा वेध– नाटकाचा नायक- माणसाचे माणूसपण टिकवणारा व्यवहारच खोटा?- सामान्यांनी व्यापलेला व्यवहार- असामान्यपण ही विकृतीच?- विकृतीचे उदात्तीकरण- माणूसपण- सांस्कृतिक संचित- असामान्यांचे पराभव- मूर्तिभंजन नव्हे- लेखकाच्या मनात नायकाबद्दल असणारा पूज्यभाव हा अडथळा- लेखकापुढचे कोडे- बयोसाठी वापरलेली भाषा- डॉ. लागू आणि शांताबाई जोग– वृद्धनटांसाठी नवा पर्याय- जिवंत कलाकृतीचे सामर्थ्य शोधावे की दोषच दाखवत बसावे?- विशिष्ट व्यक्तींशी मिळतीजुळती पात्रे- प्रो. भानू व महर्षी कर्वे- घटनात्मक सत्य आणि प्रवृत्तिगत सत्य- अखंड ताटातुटीची / न संपणाऱ्या उभारीची कथा- शोकाच्या दोन पातळ्या- शोकान्त आणि शोकात्म- ताटातुटीचे विविध रंग- पुत्र पुरुषोत्तम- कन्या कृष्णा- अनाथ महिलाश्रम- बयोलाही आश्रम बंद- ध्येयवादाशी समरस न होणारी माणसे दुरावली जातात- बयोची शरणागती– भानू आणि केशव- भानूंची आणि आश्रमाची ताटातूट- बयो भानूंसारखी कठोर होते- भानूंची आंतरिक माया- बयोची व्यक्तिरेखा- बयो ही ध्येयवादिनीच.

(१०) भग्नमूर्ती / १६५ ते १७०
 प्रायोगिक तंत्राने सादर केलेले नाटक- आरंभ- वास्तवाचा आभास निर्माण करण्यासाठी तंत्राचा वापर- सुशिक्षित बेकाराची कहाणी- रूढ अर्थाने

(५)