पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानले जातात. गडकऱ्यांविषयी कोल्हटकर गुरुजींचे मत असे आहे की गडकरी वाङ्मयात त्यांची नाटके सर्वांत निकृष्ट आहेत. त्यापेक्षा विनोदी लेख सरस आणि सर्वांत सरस कविता आहे. नाटकांमध्येसुद्धा भावबंधन हे नाटक त्यातल्या त्यात बरे. बाकीची नाटके सर्वांत तर अधिकच टाकाऊ आहेत. हेही गडकऱ्यांची लोकप्रियता शिखरावर असतानाचे कोल्हटकरांचे मत आहे. कोल्हटकरांची वाङ्मयीन समज किती, यावर प्रकाश टाकणारी ही भूमिका. याचा एकत्र विचार आपण करू लागलो तर निर्णय असा घ्यावा लागेल की, या ज्येष्ठ समीक्षकाजवळ व्यासंग खूप होता. जाणकारी त्यामानाने फार थोडी होती. करंदीकरांनी हा निर्णय सौम्यपणे सांगितला आहे आणि तो नव्याने विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

सुधारक व पुरोगामी - पण आवाका किती?
  कोल्हटकर हे सामान्यपणे सुधारक व पुरोगामी लेखक मानले जातात. त्यांच्या सुधारणावादाचा व पुरोगामीपणाचा आवाका किती याचाही एकदा विचार व्हायला हवा. न्या. रानडे यांच्या सुधारणावादाचे कोल्हटकर हे चाहते. ते स्वतः पुनर्विवाहाचे समर्थक, पण पुनर्विवाहासंबंधी कोल्हटकरांचे मत काय? पुनर्विवाह निंद्य नसून न्याय्य आहे असे त्यांना वाटते. पण तो अनुकरणीय व उदात्त आहे असे मात्र त्यांना वाटत नाही. श्रेष्ठ धीरोदात्त नायिकेने स्वीकारण्याजोगा हा मार्ग आहे असे त्यांना वाटत नाही. ही भूमिका काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. जर नायिका श्रेष्ठ चारित्र्याची असेल तर तिने वैधव्य सहन केले पाहिजे. गत पतीच्या स्मृतीच्या आठवणींवरच जीवन व्यतित केले पाहिजे. ही गोष्ट अनुकरणीय, कित्यादाखल ठेवण्याजोगी. पण व्यक्तिमत्त्व इतके श्रेष्ठ नसेल तर आणि राहवत नसेल तर तरुण स्त्रीला तिने चोरून व्यभिचार करू नये म्हणून पुनर्विवाहाची गौण पक्ष म्हणून परवानगी, अशी ही भूमिका आहे. फुले, रानडे यांच्यानंतर शेजारी महर्षी कर्वे असताना एका सुधारकाचे हे विचार आहेत, हे विसरता येणार नाही. परंपरेने समाजव्यवस्थेत जे कनिष्ठ मानले गेले होते त्यांच्यात घटस्फोट व पुनर्विवाह रूढ होतेच. कोल्हटकर आपद्धर्म म्हणून वरिष्ठवर्गीय विधवांना क्षम्य सवलत म्हणून कनिष्ठ वर्गीय स्त्रियांच्या सवलती देत आहेत, इतकाच याचा अर्थ होतो

४० / रंगविमर्श