पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रा. नरहर कुरुंदकर यांनी मराठी रंगभूमी,मराठी नाट्यसृष्टी याबद्दलचे आपले विचार वेळोवेळी व्याख्याने,पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना आणि क्वचित स्वतंत्र लेख या रूपाने मांडले. संस्कृत नाट्यशास्त्रावरही त्यांनी अधूनमधून लिहिले. आधुनिक नाट्याची परंपरा भाण, यक्षगान वगैरे प्राचीन नाट्यप्रकारांशी कशी निगडित आहे याचा शोध ते साक्षेपाने घेत.शारदा, तुझे आहे तुजपाशी, हिमालयाची सावली, कौंतेय यांसारख्या नाटकांवरचे त्यांचे भाष्य हे पठडीबंद नाट्यपरीक्षकांपेक्षा अगदी वेगळे आहे. कोल्हटकर, गडकरी. पु. ल. देशपांडे वगैरेंच्या वैशिष्ट्याचेही नवे पैलू कुरुंदकर दाखवतात. कुरुंदकरांच्या मराठी नाट्यविषयक सर्व उपलब्ध लेखांचे हे संकलन करताना अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. सर्वांना धन्यवाद.

- संपादक


प्रकाशक
श्याम दयार्णव कोपर्डेकर
इंद्रायणी साहित्य
२७३,शनवार पेठ
पुणे ४११०३०
 संकलन सहाय्य व श्रेयनिर्देश
 श्री.रा.चिं.ढेरे
 प्रा.भु.द.वाडीकर
 प्रा.दत्ता भगत.
 श्री. यदुनाथ थत्ते
© श्रीमती प्रभावती कुरुंदकर

प्रकाशन दिनांक
१५ ऑगस्ट १९९१
 टाईपसेटिंग
 प्रमोद प्रिंटर्स
 ११२० ,सदाशिव पेठ
 पुणे ४११०३०
मुखपृष्ठ
अनिल उपळेकर

मूल्य - ९०/- रुपये
 मुद्रक
 प्रमोद वि.बापट
 स्मिता प्रिंटर्स
 १०१९,सदाशिव पेठ
 पुणे ४११०३०