मृदुसंवेगो मध्यसंवेगस्तव्रिसवइति । तथामध्योपायः मृदुसंवेगोमध्य
संवेगस्तीव्र संवेगश्च । तथाऽधिमात्रोपायः मृदुसंवेगो मध्यसंवेगस्तीव्र -
संवेगश्चेति । ततः तत्र तीव्र संवेगेषु अपि मृदुमध्याधिमात्रत्वात्
मृदुतीव्रो मध्यतीव्रोऽधिमात्रतीव्र इत्यतः विशेषः । भेदः भवति भू-
दुती संवेगस्यासन्नः । ततोमध्यतीव्र संवेगस्यासन्नतरः । तस्मात् अधि
मात्र तीव्र संवेगस्याऽघिमात्रोपायस्याप्यासन्नतमः समाधिलाभः समाधि-
फलं चेति । अतअधिमात्रोपाये तीब्रेच संवेगे महान् यत्नः कर्त्तव्य
इति भेदोपदेशः ॥ २२ ॥
अर्थ -[ अतिशय वैराग्य बाळगणारे असे कोण ते सांगतो. ]
योग्यांचे उपाय श्रद्धा वीर्य इत्यादिक ह्यांचे तीन प्रकार आहेत. ते
असे – १ मृदु (ह्मणजे अल्प ) उपाय, २ मध्य ( ह्म० मध्यम )
उपाय, आणि ३ अघिमात्र (ह्मणजे अतिशय किंवा उत्कट ) उ-
पाय. ह्यांत मृदु उपाय योजणारांचही तीन प्रकार आहेत. ते असे-
१ मृदुसंवेग ( ह्मणजे अल्प वैराग्य बाळगणारे ), २ मध्यसंवेग (ह्म०
मध्यम वैराग्य बाळगणारे ), आणि ३ तीव्रसंवेग ( ह्म० अतिशय
वैराग्य बाळगणारे ). ह्याचप्रमाणे मध्यम उपाय योजणारांचेही तीन
प्रकार आहेत. ते असे – १ मृदुसंवेग, २ मध्यसंवेग, आणि ३ तीव्र
संवेग. तसेंच, अधिमात्र उपाय योजणारांचेही तीन प्रकार आहेत.
ते असे – १ मृदुसंवेग, २ मध्यसंवेग, आणि ३ तीव्रतंवेग. ह्याप्रमाणें
योगाच्या उपायांचे नऊ प्रकार असून, त्यांमुळे योगीही नऊ प्रकारचे
आहेत, आतां उपायांच्या संबंधानें तीव्रसंवेगामध्येही अल्प, मध्यम
व अतिशय असे तीन प्रकार असल्यामुळे ज्यांना तीव्रसवेग आहे
अशा योग्यांमध्येही भेद आहे. ह्मणून जे नऊ प्रकारचे योगी सां-
गितले त्यांमध्यें मृदु तीव्र वैराग्याचे योग्यांपेक्षां मध्यम तीव्र वैराग्याचे
योग्यांचा समाधिअतिशय जलद साधतो. त्यांच्यापेक्षां अधिमात्र
तीव्र वैराग्याचे योग्यांचा समाधि अतिशय जलद साधतो. ह्यास्तव
पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/४८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५