ते तथाविधसमाधिभाजो भवति । तेषां परतत्वादर्शनात् योगाभ्या-
सोऽयं । अतः परतत्वज्ञाने तद्भावनायांच मुक्तिकामेन यत्नः विधेय-
इत्येतदर्थमुपदिष्टं ॥ १९ ॥
अर्थ -[ ह्याप्रमाणे योगाच्या स्वरूपाचे भेद सांगितले व त्याचा
उपायही थोडक्यांत सांगितला. आतां जो खरा योग नसून योगात्र-
माणे भासतो त्याविषयीं अगोदर सांगून योगाचा उपाय सविस्तर
सांगण्यास आरंभ करितो. ] सानंदसमाधीमध्ये ज्या संकोचित बु
डीच्या मनुष्यांना परमेश्वराचा साक्षात्कार होत नाहीं, ते देहावरील
अहंकारानें रहित असल्यामुळे त्यांना विदेह असे ह्मणतात. आणखी
सास्मितसमाधीमध्ये संतुष्ट असलेल्या ज्या मनुष्यांना परमेश्वराचें
ज्ञान होत नाहीं त्यांचें चित्त आपल्या ( स० चित्ताच्या ) कारणा-
मध्यें लय पावलें असतां, त्यांना प्रकृतिलय असें ह्मणतात. आतां
विदेह आणि प्रकृतिलय ह्या दोघांच्या समाधीचे कारण संसार आहे.
ह्याचा अर्थ असा कीं, अशीं मनुष्यें ( आपल्या योग्यतेमुळे ) संसा-
रांत पडल्यानेंच त्यांना तशा समाधींचा उपभोग होतो. ह्यास्तव त्यांनीं
परमेश्वराचे ज्ञान होण्यास्तव व मुक्ति मिळण्यास्तव प्रयत्न करावा
झणून हा उपदेश केला आहे असे समजावें ॥ १९ ॥
टीका - अन्येषां योगिनां समाधिः कथमित्यतआह ॥ श्रद्धेति ॥
इतरेषां विदेहप्रकृतिलयव्यतिरिक्तानां योगिनां श्रद्धावीर्यस्मृतिस-
माधिप्रज्ञापूर्वकः श्रद्धा योगविषये चेतसः प्रसादः वीर्यमुत्साहः
स्मृतिरनुभूतविषयासंप्रमोषः समाधिरेकाग्रता प्रज्ञा प्रज्ञातव्यवि-
वेकः श्रद्धादयः पूर्वे उपाया यस्य स श्रद्धादिपूर्वकः समाधिः । श्र
द्धावतो वीर्यं जायते योगविषये उत्साहवान् भवति । सोत्साहस्य
पाश्चात्यासु भूमिषु स्मृतिरुपजायते । तत्स्मरणाच्चेतस्समाधीयते ।
समाहितचित्तश्र भाव्यं सम्यग्विजानाति । त एते संप्रज्ञातसमाधे-