Jump to content

पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणेन अनुभूतस्य विषयस्य योऽयमसंप्रमोषः संस्कारद्वारण बुद्धावुपा- रोहः सः स्मृतिः । तत्र प्रमाणविपर्ययविकल्पाः जाग्रदवस्थाः । त एवं यदाऽनुभवबलात् प्रत्यक्षायमाणास्तदा स्वप्नः । निद्रात्वसंवेद्यमान विषया । स्मृतिश्च प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रानिमित्ता ॥११॥
 अर्थ – [ स्मृति ह्मणजे काय हे सांगतो. ]( प्रत्यक्ष, अनु- मान व शाब्द ह्यांपैकी कोणत्याही ) प्रमाणानें अनुभवास आलेल्या विषयास न सोडणे ह्मणजे संस्काराच्या द्वारानें बुद्धीस तो विषय स्फुरणे अशा वृत्तीस स्मृति असें ह्मणतात. आतां पांच प्रकारच्या वृत्तीमध्ये प्रमाण विपर्यय आणि विकल्प ह्या तीन वृत्ती जागृत अ- वस्था आहेत. अनुभव बळकट झाल्या कारणाने झोपत जेव्हां त्या गोचर होतात तेव्हां ती स्वप्नावस्था होय. निद्रावस्थेत तर वि- भयाचें कांहींच ज्ञान नसर्ते, आणि स्मृतीचीं कारणे प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि निद्रा हे आहेत ॥ ११ ॥

अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः ॥ १२ ॥

 टीका – एवं वृत्तीर्व्याख्याय सोपायं निरोधं व्याख्यातुमाह || अभ्यासेति || अभ्यासवैराग्याभ्यां वक्ष्यमाणलक्षणे अभ्यासवैराग्ये ताभ्यां तन्निरोधः तासां प्रकाशप्रवृत्तिनियमरूपाणां चित्तवृत्तीनां य- त्प्रतिहननं स निरोधः । किमुक्तं भवति । तासां विनिवृत्तबाह्याभि- निवेशानामंतर्मुखतया स्वकारण एव चित्ते शक्तिरूपतयावस्थानं । तत्र विषयदोषदर्शनजेन वैराग्येण तद्वैमुख्यमुत्पाद्यते । अभ्यासेन च दृढं स्थैर्यमुत्पाद्यते । इत्याभ्यां भवति चित्तवृत्तिनिरोधः ॥ १२ ॥
 अर्थ –[ ह्याप्रमाणे वृत्तीविषयीं सांगितल्यावर आतां त्यांचा नि रोध उपायासहित सांगतो.] अभ्यास व वैराग्य ह्मणजे काय हें पुढें सांगितले आहे. त्यांच्या साधनांनी, प्रकाशित करणे, प्रवृत्तकरणें, आणि नियमन करणे अशा ज्या चित्ताच्या वृत्ती त्यांना मारणे (ह्म ० व्यापाररहित करणे) हा निरोध होय. ह्यावरून असें जाणावें कीं, चि-