ज्ञानानुपाती शब्दजनितज्ञानं शब्दज्ञानं तदनुपतितुं शीलं यस्य स शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यः प्रत्ययः विकल्पः ॥ अस्योदाहर- णानि । राहोशिरः । पुरषस्य चैतन्यं । शशशृंगतुल्यमित्यादि ज्ञा- नानि । बोधोत्तरमप्येतादृशज्ञान शब्दज्ञानरूपोव्यवहारः क्रियत इति ॥ ९ ॥
अर्थ – [ विकल्प ही काय वृत्ती आहे हे सांगतो. ] शब्दापासून मात्र ज्ञान होतें, परंतु तसा पदार्थ नाहीं ; अशा प्रसंगी जी चित्ताची वृत्ति तिचें नांव विकल्प. उदाहरण, राहूचें डोकें, आत्म्याचे चिंतन, सशाचे शिंग, इत्यादि पदार्थ नसून केवळ शब्दज्ञान आहे असें समज- ल्यावर लोक तशा शब्दज्ञानाचा उपयोग करितात ॥ ९ ॥
टीका - निद्रांव्याख्यातुमाह ॥ अभावेति ॥ अभावप्रत्यया- लंबना अभावप्रत्ययः आलंबनं यस्या स्सा वृत्तिः निद्रा । एतदुक्तं भवति । या संततमुद्रिक्तत्वात्तमसस्समस्तविषयपरित्यागेन प्रव- र्तते वृत्तिस्सा निद्रेति ॥ अस्याश्च सुखमहमस्वाप्समिति स्मृतिदर्शनात् स्मृतेश्चानुभवव्यतिरेकेनानुपपत्तेर्वृत्तित्वं ॥ १० ॥
अर्थ – [ निद्रा (जीत स्वम नाहीं अशी झोप ) ह्मणजे काय हे सांगतो. ] अभाव ह्मणजे कांहीं नाहीं अशा अनुभवाचा आश्रय करू- न राहाणारी जी वृत्ति ती निद्रा होय. ह्याचा अर्थ असा समजावा की, पूर्वी एकसारखा अंधार उत्पन्न झाल्यामुळे सर्व विषय सोडिल्या- चे योगानें जो वृत्ति प्रवृत्त होते ती निद्रा होय. निर्हेतून उठल्यावर "मला गोड झोप लागली होती " असें स्मरतें, आणि तसा अनुभव नसता तर तशी आठवण झाली नसती. ह्यावरून निद्रा ही ( केवळ शून्य स्थिति नसून ) वृत्ति आहे असे सिद्ध होतें.
टीका - स्मृति व्याख्यातुमाह || अनुभूतविषयासंप्रमोषः प्र-