टीका - अन्नातिप्रसिद्धत्वात् प्रमाणानां लक्षणमनुत्त्व विभाग:
कृतः । प्रत्यक्षानुमानागमाः प्रत्यक्षंच अनुमानंच आगमश्च । तत्रान-
धिगतार्थनिश्चयरूपा चित्तवृत्तिः प्रत्यक्षं प्रमाणं । व्याप्त्या दिप्रमाणन्या-
यवृत्तिरनुमानं । आप्तवचनजन्यवृत्तिरागमः । इति त्रीणि प्रमाणानि॥७॥
अर्थ - [प्रमाण ह्या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध असल्यामुळे त्याचे
लक्षण न सांगतां विभाग सांगतो, ते येणेत्रमाणे.] १ प्रत्यक्ष, २ अनु-
मान, आणि ३ आगम. ह्यांमध्ये प्रत्यक्ष प्रमाण ह्मणजे पूर्वी माहि-
त नव्हता अशा पदार्थाविषयीं निश्चयरूप जी चित्ताची वृत्ति होते
ती. अनुमान प्रमाण ह्मणजे न्यायशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे व्याप्ति
इत्यादिकांच्या बरोबर ज्ञानाच्या योगानें जी चित्ताची वृत्ति बनते तो.
आगम प्रमाण ह्मणजे यथार्थ बोलणाराच्या शब्दापासून जी चित्ता-
ची वृत्ति होते ती. ह्या प्रकारें प्रमाणे तीन प्रकारची आहेत ॥ ७ ॥
-
टीका - विपर्ययरूपामाह || विपर्यय इति ॥ अतद्रूपप्रतिष्ठ
तस्यार्थस्य यद्द्रूपं न तस्मिन् रूपे प्रतिष्ठते तस्यार्थस्य यद्रूपन तत्प्रति-
भासयतीति यावत् मिथ्याज्ञानं अतथा भूतेऽर्थे तथोत्पद्यमानं ज्ञानं
यथा शुक्तिकायां रजतज्ञानं अतद्रूपप्रतिष्ठत्वात् संशयोपि यथा स्था-
णुर्वा पुरुषो वेति मिथ्याज्ञान विपर्ययः ॥ ८ ॥
अर्थ - [विपर्यय ह्मणजे काय हें सांगतो.] कोणत्या एक पदार्था-
चें जें रूप नव्हे तें रूप भासविणारें जें खोटें ज्ञान त्यास विपर्यय
असें ह्मणतात. जसें, पांढरी शिंप पाहिली असतां ती रुपें आहे असे
भासविणारें जें खोटें ज्ञान तें विपर्यय होय. आणखी झाडाचा सोट
पाहिला असतां तो सोट आहे किंवा मनुष्य आहे असा जो संशय
तोही मिथ्या ज्ञान होय.
टीका — विकल्पवृत्तिमाह || शब्दज्ञानानुपात इति ॥ शब्द-