Jump to content

पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगतो.] जेव्हां चित्ताच्या वृत्तीचा निरोध केलेला नसतो, तेव्हां पुढे ज्या वृत्ती सांगितल्या आहेत त्यांच्या स्वरूपाप्रमाणे आ त्म्यांचे स्वरूप बनतें. ह्याचा अर्थ असा की, सुख, दुःख, मोह, अशा ज्या प्रकारच्या वृत्ती उत्पन्न होतात त्या प्रकारचे स्वरूप आ त्म्याचें आहे असे प्रपंचांतले लोक समजतात. ह्यावरून असे जा- णावें कीं, जी वस्तु (ह्मणजे चित्त) एकाग्र झाली असतां चिद्रूप आत्म्याची स्थिति आपल्या स्वरूपांत असते, आणि जशा पाण्याच्या लाटा हलल्या असतां चंद्र हलल्यासारखा वाटतो, तशी जी वस्तु इंद्रियांच्या वृत्तींच्या द्वारानें विषयाशी रंगली असतां आत्मा तसा रंगलेला दिसतो, ती वस्तु चित्त होय ॥ ४ ॥

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाऽक्लिष्टाः ॥ ५ ॥

 टीका – ननु वृत्तयो निरोद्धव्या इत्युक्तं | ताः पुनः कियत्प्रकाराः कीदृश्यो वेत्याकांक्षायामाह || वृत्तय इति ॥ वृत्तयः चित्तस्य परिणामविशेषाः । पञ्चतय्यः पंचप्रकाराः । क्लिष्टाः क्लेशैर्वक्ष्यमाणलक्ष- णैराक्रांता: अष्टाः तद्विपरीताः ॥ ५ ॥
 अर्थ - [वृत्ती आवरून घराव्या ह्मणून सांगितलें, त्यास त्या कि- ती प्रकारच्या आहेत व कशा आहेत अशी कोणी शंका घेईल, तर त्या शंकेर्चे समाधान सांगतो. ] चित्तांचे जे विशेष परिणाम त्या वृत्ती होत. वृती पांच प्रकारच्या आहेत. त्या दुःखकारक किंवा सुख- कारक आहेत.
प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रा स्मृतयः ॥ ६ ॥  टीका- कास्ताः पंचवृत्तय इत्याह ॥ प्रमाणविपर्ययविकल्पनि- द्रास्मृतयः प्रमाणंच विपर्ययश्च विकल्पश्च निद्राच स्मृतिश्च ॥ ६ ॥
 अर्थ – [ त्या पांच वृत्ती कोणत्या त्या सांगतो.] १ प्रमाण, २ विपर्यय, ३ विकल्प, ४ निद्रा, आणि १ स्मृति.

प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ॥ ७ ॥