Jump to content

पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समाधिपादांतील विषय.

 योग ह्मणजे काय ( सू० २ ); चित्तवृत्ति ( सू० ५ ) व निरोध ( सू० १२ ) ह्या शब्दांचे वर्णन; अभ्यास ह्मणजे काय (सू० १३ ); वैराग्य ह्मणजे काय ( सू० १९ ); त्या दोन उपायांचे स्वरूप व भेद आणि योगाचा मुख्य भेद संप्रज्ञात ( सू० १७ ) व असंप्रज्ञात (सू० १८); योगाभ्यास करण्याचे सविस्तर उपाय (सू० २०-२२); हीं सांगून नंतर सोपा उपाय दाखविण्याकरितां ईश्वराचे स्वरूप ( सू० २३ व २४ ); त्याचे अस्तित्वाविषयीं प्रमाण ( सू० २५ ) ; त्याचे सामर्थ्य ( सू० २६ ); त्याचें नांव व उपासना करण्याचा क्रम ( सू० २७ व २८ ); त्या उपासनेची फळे ( सू० २९); हीं सां- गितली आहेत. मग चित्ताला होणारे अडथळे ( सू० ३० ); व त्यांपासून उत्पन्न होणारे दुःखादिक ( सू० ३१ ); व त्यांचे निवा- रण करण्यास्तव एकतत्वाचा अभ्यास ( सू० ३२ ); दुसऱ्यांविषयीं सदंतःकरण ( सू० ३३); प्राणायाम ( स० ३४ ); संप्रज्ञात व असंमज्ञात समाधीला साघनीभूत अशी इंद्रियांचे विषय ज्या वृत्तींत फलरूपानें राहतात तशी वृत्ति धारण करणे, इत्यादि साधनें सांगून पुढे समापत्ति ह्मणजे काय (सू० ४१); तिचे लक्षण (सू० ४२-४४); तिचें फळ ( सू० ४६-४८); व निरनिराळ्या प्रकारच्या समापत्ती- चे विषय सांगून संप्रज्ञात व असंप्रज्ञात समाधीविषयीं वर्णन करून मग प्रथम सबीजसमाधि सांगून, निर्बीजसमाधीचें ( सू० ११ ) वर्णन देऊन पहिला पाद समाप्त केला आहे.