योगशास्त्र फार प्राचीन काळची विद्या आहे ह्मणून ती निरुप- योगी होत नाहीं. कित्येक गोष्टी अशा आहेत कीं, त्यांना का- लाच्या गतीनें बाध येत नाहीं. उदाहरणार्थ, गणितशास्त्रांत बेरीज, गुणाकार, इत्यादिक जे व्यापार सांगितले आहेत ते जरी फार प्राचीन काळापासून आहेत, तथापि अर्वाचीन काळच्या नवीन शोधांमुळे त्यांत कांहीं फेरफार झाला आहे काय ? किंवा पुढे आणखी नवीन शोध लागल्यास त्यांत कांहीं बदलणूक होण्याचा संभव आहे काय ? फार प्राचीन काळापासून आजपर्यंत १ आणि १ मिळून दाहा होत आले, तर ह्यापुढें कधीं तरी नवीन शोधांमुळे ही बेरीज कमी जास्त होईल काय ? हैड्रोजन आणि आक्सिजन् हे दोन्ही मिळून पाणी होतें हैं प्राचीनकाळी माहीत नव्हतें, ह्मणून प्राचीनकाळच्या व ह ह्रींच्या पाणी पिण्याच्या व तें पचविण्याच्या रीतींत कांहीं फरक झाला आहे कीं काय ? कांहीं नाहीं.ह्याप्रमाणे योगशास्त्रांत सांगितलेले व्यापार व त्याचे परिणाम हे नवीन शोधांवर अवलंबून
नसल्यामुळे अर्वाचीन काळच्या वृद्धिंगत झालेल्या ज्ञानानें योगशा- स्वास बिलकुल बाध येत नाहीं.इतक्या उपर जो बाध येतो असे ह्मणतो त्याचें ह्मणर्णे अस्तिपक्षाचे असल्यामुळे तें ह्मणे सिद्ध कर-ण्याचा बोजा त्याच्यावरच आहे.
येणेप्रमाणे बहुतेक अडथळे निवारण केल्यावर आतां चालू विषय ह्मणजे योगशास्त्र ह्याविषयीं विचार करूं.
तत्वज्ञानसंबंधी सहा दर्शनें आहेत. ती येणेप्रमाणे:- १ न्याय, २ मीमांसा, ३ वैशेषिक, ४ सांख्य, ५ पातंजल, आणि ६ वेदांत. ह्या सहाही दर्शनांचा उद्देश असा आहे कीं, मनुष्याला जन्ममर- णरूप दुःखांतून मुक्त करून त्यास परमसुख प्राप्त करून द्यावें. पा- तंजलदर्शन ह्मणजे योगशास्त्र. ह्या दर्शनाचा स्थापन करणारा प- तंजलि ऋषि होय. तथापि तो योगशास्त्र उत्पन्नकर्त्ता नव्हे. त्याणे पूर्वी.
पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/२८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५