तीन पायांचे एक लांकडी मेज (इं० ट्राइपाइ) आणून त्याच्या वर एक फडकें हांथरावें, आणि त्याच्या भोंवती खुर्च्या ठेवून पांच किंवा अधिक मनुष्यांनीं बसावें. मग त्या मनुष्यांनी आपले दोन्ही हात पसरून आंगव्याला आंगठा लावून मेजावर ठेवावे, ते असे कीं, सर्वांच्या करंगळीचा परस्परांस स्पर्श होऊन सर्वांचे हाताचे एक वर्तुळ होईल. नंतर प्रश्न विचारणाराने आपल्या मनांत प्रश्न करून सर्वांनी एकाग्र होऊन जबाब काय येतो तो पाहाण्याकडे लक्ष्य लावून बसावें. मग तीं मनुष्यें योग्य अ- धिकारी असल्यास त्या मेजाचा एक पाय आपोआप उचलूं ला गून जमिनीवर आपटूं लागतो. मग एकसारखे किती ठोके प- तत हैं ठोका राही तोपर्यंत मोजावे, व त्यांची जी संख्या येईल त्या संख्येपर्यंत मूळाक्षराच्या प्रारंभापासून मोजून त्या संख्येला जें अक्षर येईल तें कागदावर मांडावें. पुनः मेजाच्या पायाचे ठोके सुरू झाले ह्मणजे पुनः तसेच मोजून जे अक्षर येईल तें पूर्वीच्या पुढें मां- डावें. ह्याप्रमाणें मेजाचा पाय हालण्याचे अगदी बंद होईतोपर्यंत अक्षरें मांडून त्यावरून जबाब सांगावा.
प्रयोग करणारामध्ये काय काय गुण असेल पाहिजेत ते थोड- क्यांत सांगतों. तो चांगला धैर्याचा व मन पराकाष्ठा एकाग्र कर- णारा असून उत्तम प्रकारें टक लावण्यासाठी त्याला पाणीदार डोळे असावेत. त्याची प्रकृती निरोगी असून मेंदू चांगला असावा. दारू पिण्याचे अथवा तंबाखू किंवा अफू किंवा गुंगी आणणारा दु- सरा कांहीं पदार्थ खाण्याचें त्यास व्यसन नसावें. त्याचें मन खव- ळणारे नसून त्याच्या अमलांत राहाणारे असावें, कारण जर त्याचेंच मन त्याच्या अमलांत राहिलें नाहीं, तर दुसऱ्याचें मन त्याच्या ता- ब्यांत कसें येईल ? हात वारण्याचा प्रयोग प्रत्येक मनुष्यावर व इतर प्राण्यांवर करण्याचा अभ्यास करावा. आपणास प्रयोग करितां
पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/२५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२