Jump to content

पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

एकमेकीशी स्पर्श करून अथवा परस्परांशी दळणवळण ठेवून रा- हिल्या असल्या तर मग त्या कितीही अंतरावर असल्या तथापि त्यांच्यांमध्यें सारखे विकार होण्याची शक्ति राहाते. अशा प्रकारें तयार केलेल्या गोगलगाया पारिस येथें व अमेरिकेत ठेविल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अक्षराबद्दल निराळी गोगलगाय ठेविली असून एखादी मेली बिली तर तिची जागा भरण्याकरितां ह्मणून कांहीं जास्त राखून ठेविल्या होत्या. मग ग्यालव्यानिक यंत्राच्या योगाने एके ठिकाणच्या गोगलगायींत गति उत्पन्न केली ह्मणजे दुसरे ठिकाणचे तिची सोबती गोगलगाईंत तशी गति उत्पन्न होई. ह्याप्रमाणें अक्षरें जुळून बातमी एके टिकाणाहून दुसरे ठिकाणीं पाठ- ण्याची तजवीज केली होती !
 मेसमेरिजमच्या संबंधाने आणखी एक चमत्कार सांगण्याचा राहिला आहे, तो असा कीं, मनुष्यांतील चुंबकशक्ति जड पदार्था- मध्येही घालतां येते. उदाहरणार्थ, पाण्यामध्ये ती शक्ति आणितां येते. ज्या मनुष्यावर मेसमेरिजम् केलेले असेल त्याला तें पाणी व साधारणपाणी दाखविलें तर तो भारलेले पाणी तेव्हांच ओळखून काढितो. पाण्याचे भांडे डावे हाताच्या तळव्यावर घेऊन डावे हा- ताच्या बोटांनी बळकट धरावें, आणि त्याच्या भोंवतीं उजवा हात वारावा अथवा बोटाचीं टोके पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येतील असा उजवा हात धरावा. अशा योगानें मनुष्यामधील चुंबकशक्ति पा- यांत जाते. हे पाणी योग्य अधिकाऱ्याला पिण्यास दिलें असतां त्याला झोप येते.
 खुर्चीच्या समोर आपण होऊन त्याच्या बसायाच्या जाग्यावर पाठी मागून आपणाकडे हात वारून तिला भारावी, आणि अधि- कायला त्यावर बसवावें, ह्मणजे त्याच्याने खुर्चीवरून उठवत नाहीं. मग आपण उलटे हात वारिले किंवा नुसती फुंक मारिली ह्मणजे लगेच तो खुर्चीवरून उठतो.