पणाराचे दळणवळण सुरू करण्याचे असल्यास प्रयोग करणाऱ्यानें त्याचा हात झोपणाऱ्याला द्यावा, अथवा त्या दुसऱ्या मनुष्याशी माझ्याप्रमाणें दळणवळण सुरू कर, असें झोंपणारास प्रयोग कर- णाराने सांगावें. त्या तिन्हाईत मनुष्याशी दळणवळण बंद करून प्रयोग करणायाशी पुनः सुरू करण्याचे असेल तर तसें करण्या- विषयीं त्या तिन्हाइतानें त्या झोंपणारास सांगितले पाहिजे. अशी अदलाबदल होते वेळी झोंपणारा जागा होत नाहीं परंतु दचकतो.
१६. प्रयोग करणारा हा झोंपणारामध्यें राग, द्वेष, मद, मत्सर, इत्यादि अनेक प्रकारचे उद्गार उत्पन्न करूं शकतो. त्याच्या- कडून गाववितो, वाचवितो, वादविवाद करवितो, व भजन करवितो, त्याला हांसवितो, रडवितो, पुराण सांगवितो, मेसमेरिजम् ह्या विष- यावर व्याख्यान देववितो, इ०.
१७. झोंपणाराचे हावभाव, स्वर, आयट, व भाषणाची पद्धत इ- त्यादिक सुरेख व उत्तम रीतीनें दृष्टोत्पत्तीस येतात. गर्व, नम्रता, क्रोध, भय, कृपाळूपणा, भक्ति, भांडखोरपणा, चिंतन करणे इत्यादि - कांची बतावणी फार उत्तम प्रकारें होते.
१८. झोपणाऱ्याला अशा अवस्थेत एरवींपेक्षां गायनानें अधिक आनंद वाटतो असें त्याच्या चेहऱ्याचे प्रफुल्लितपणावरून व त्याच्या स्वताच्या वर्तनादिक कृतीवरून दिसून येते.
१९. झोंपणाराला ज्या गोष्टीविषयी खात्री होत नाहीं, किंवा जी गोष्ट त्याच्या दृष्टोत्पत्तीस स्पष्ट येत नाहीं, त्या गोष्टीविषयीं त्याला विचारिलें असतां तो उत्तर देत नाहीं. तो वारंवार असें ह्मणतो की, "मला बरोबर समजत नाहीं," "मला खात्रीनें सांगवत नाहीं,' " तसें आहे किंवा नाहीं हें मला कळत नाहीं, " " जें मला कळत नाही किंवा समजत नाहीं तें मी बोलणें बरोबर नाहीं," इ०. अशा खरेपणानें त्याच्या बोलण्याला जास्त महत्व येतें.
पान:योगसूत्रें-समाधिपाद.pdf/१७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४