शुद्धी नाहींशी होते. झोप कितीवेळ लागली किंवा झोपेत काय घडलें ह्यांचे त्याला जागे झाल्यावर अगदीं भान नसतें. तो उठतो तो एकाएक मोठा सुस्कारा टाकून उठतो आणि ह्मणतो कीं, मोठी नामी झोप लागली होती. ह्या अशा झोंपेचे काय गूण आहेत ते सांगतों
१. झोपणाराला प्रयोग करणाराने कांहीं विचारिलें तर तो स- युक्तिक जबाब दोतो. त्याला वारंवार संदेह उप्तन्न होतो तेव्हां तो मला माहीत नाहीं " असें वारंवार ह्मणतो. जर त्याला झटलें कीं, ऊठ आणि चल तर तो उठून चालू लागतो, तथापि त्याचे डोळे झांकलेले असतात अथवा उघडे असल्यास बुबुळे वर फिरलेली अस- तात किंवा डोळ्यांना उजेडाचे अगदी ज्ञान नसतें. कित्येक लोक झोपेतून उठून चालत जातात त्यांच्या प्रमाणे त्याची स्थिती असते, मात्र पदार्थ असल्याचे त्याला ज्ञान होतें.
२. झोंपणाराचे श्रोत्रेंद्रिय, नेहमीं नाहीं तथापि कधीं कधीं, फा- रच तिखट होतें. चक्षु, घाण, रसन व स्पर्शेद्रिय हे निर्व्यापार होऊन श्रोद्रिय एकाग्र झाल्यामुळे तसें घडत असावें असें वाटतें. झोपेत केव्हां केव्हां, व प्रयोग करणाराची मर्जी असल्यास पाहिजे तेव्हां, असें घडते कीं, झोंपणाराच्या कानाशी मोठ्याने ओरडले किंवा घंटा वाजविली तरी त्याला अगदीं ऐकूं जात नाहीं.
३. जार्गे झाल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे देतां येतील इतकी झोंप जेव्हां झोपणाराला लागते, तेव्हां त्याचा चेहरामोहरा व वाणी ह्यां- मध्ये विलक्षण फेर पडतो. त्याचे डोळे झांकलेले असले तथापि त्या- च्याशीं बोललें असतां तो जणूं कांहीं पाहतो ह्याप्रमाणें त्याच्या तोंडावर हुशारी दिसते. जागेपणीच्यापेक्षां त्याची बुद्धि ज्यास्त प्रफुल्लित दिसते. त्याचे वाणींतही फरक पडून तो हलके बोलतो.
४. त्या झोपणाराला आपण कोण ह्याचे भान अगदीं हतार