पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकाशिकेचे मनोगत दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, असे सुंदर या वयाचे वर्णन केले आहे. कळीचे फूल होत असताना तिच्या आणि त्याच्याही मनामध्ये गोंधळ उडालेला असतो. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यासाठी आणि आयुष्यात येणा-या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी, आयुष्याची तत्त्वं आणि मूल्यं यांची माहिती करून घेण्यासाठी,याविषयीची समज वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा काळ. उडणा-या गोंधळालाविवेकाने आणि सहज सोप्या पद्धतीने समजून घेण्याची गरज असते. इगो तयार होत असतो. म्हणूनच न दुखावता साध्या शब्दांत महत्त्वाच्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं सुंदर, सोप्या, सरळ भाषेत लिहिलेलं हे महत्त्वपूर्ण पुस्तक. तरुण मुलामुलींसाठी खास गोष्टीरूप कॉमिक्ससारखं हे सुंदर पुस्तक. या वयोगटातील मुलामुलींना मार्गदर्शन करणा-या डॉ. राजश्री देशपांडे या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण डॉक्टर आणि व्यक्ती आहेत. ओघवत्या आणि सोप्या भाषेच्या माध्यमातून राजश्री यांनी हे काम सोपं केलं आहे. याच वयोगटातील जिगीषा मुळ्ये वयोगटातील चित्रकार तरुणीनं पुस्तक वाचून चित्रं काढली आहेत. जय कॉम्प्युटर्सचे धनंजय जाधव आणि या प्रवासात आमचे सहप्रवासी असलेले कैलास जाधव यांनी या पुस्तकाची सुंदर मांडणी केली आहे. वसंताचे रंग घेऊन येणारं, वसंतोत्सव साजरा करायला मदत करणारं हे पुस्तक आमच्या मित्र-मैत्रिणींना आवडेल, अशी आशा आहे. अॅड. वर्षा देशपांडे