पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : बंड्या त्यापेक्षा ओळख करून घे, फ्रेण्डशिप कर. बंड्या : ह्या, त्यात काय इंटरेस्ट नाहीये, दाबायला कुठं मिळणार मग? संज्या : आरं लेका, ऊशी दिऊ का दाबायला? आरं दाबायला मिळण्यापेक्षा आपल्याबरोबर बोलणारी, हसणारी, आपल्याला चांगला दोस्त समजणारी मैत्रीण असली तर.. भारी वाटेल की नाही? बंड्या : भारी वाटेल, पण अशा चांगल्या मैत्रिणी मिळणार कुठं? त्यो काय सम्राटचा वडापाव हाय का की, चांगली मैत्रीण हमखास मिळण्याचे ठिकाण. तिथं गेलं की मिळाली मैत्रीण संज्या : आपण पहिले चांगले मित्र बनू या.... मग मिळतील. बंड्या : म्हणजे कसा? संज्या : सोनी सांगत होती लायनीत राहणारी, जास्त शायनिंग न करणारी, अभ्यास करणारी असली मुलं मुलींना आवडतात. अक्ष्या : अरे वा.. चला तर मग सुधारुया स्वत:ला. 44