पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : अरे बापरे, सांगतो बंड्याला ! पण मग असं मुलांना मुलीबद्दल मुलींना मुलांबद्दल वाटणं बरोबर आहे. सोनी : वाटणं बरोबर आहे, वागणं नाही. बाई सांगत होत्या या वयात आपण भावनेने वागतो विचरांनी नाही. आणि म्हणून मनात येईल ते करतो. पटकन रडतो, चिडतो, अपमान वाटून घेतो. संज्या : हो गं,तसाच आडकलो ना मी त्या गांज्याच्या भानगडीत. कसला राडा झालेला. सोनी : करेक्ट, तेच पोरींच्या बाबतीत. आवडलं, ठीक आहे, त्या पण पुढच्या पाय-या आता नको. कांबळे बाई सांगत होत्या, शारीरिक आकर्षणाच्या पाय-या ओलांडल्या की, मुलंबाळ, संसार हेच टप्पे असतात. ते या वयात पेलत नाहीत. तेवढं आपलं शरीर तयार नसतं. नोकरी धंदा नसतो. मग कोण कुणाला सांभाळणार? कसं जगणार? शिवाय शरीराचं पण मात्र होतं. निष्काळजीपणा अज्ञानातून होतो. नको असताना बाळ रहातं. खूप नीट समजावून सांगितलं की कशी गोची होती. O०००