पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोनी : काय आवडतं भावड्या त्याला. तिला आवडेल असं हाय का काई त्याच्यात. तोंड बघ आरशात म्हणावं मवाली १ नंबर, संज्या : तिला आवडणार नाही का तो? सोनी : मुळीच नाही." संज्या : चांगला चिकना आहे की, शिवाय बाईक आहे. त्याच्याकडे. स्मार्ट मोबाईल पण. सोनी : भावड्या, तुम्ही मुलं जरा बावळटच असता सगळ्या पोरींना बाईक/मोबाईलमुळे पोंर आवडतात की काय? ब-याच पोरींना पोरं आवडतात ती वेगळीच." संज्या : म्हणजे कसली ? सोनी : लायनीत राहणारी, नीटनेटकी दिसणारी, मोकळे बोलणारी पण चोंबडेपणा न करणारी, अभ्यास-बिभ्यास करणारी ! फालतू शायनिंग टाकणारी पोरं अजिबात आवडत नाहीत. संज्या : बोंबला, म्हणजे आमची वाटच. सोनी : हो ना, त्यात तुला दाढीपण नाहीय आलेली (चिडवत). संज्या : सोने, हाणीन कानफडात. सोनी : आरं मजा केली. दाढी येण्याशी काही संबंध नाही पोरी आवडण्याचा. संज्या : तुला काय माहित गं? सोनी : एक तर मी पोरगी. माझ्या मैत्रीणी पोरी. काल कांबळे बाईंनी वर्गात वयात येताना म्हणून प्रोग्रॅम घेतला. खूप भारी होता. खूप गोष्टी कळल्या त्यातून. संज्या : मला पण सांग की सोने 38)