पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : सोने, किती वेळ उभीयस आरशासमोर, आवर चल पटपट. बास कर नखरं तुझं." सोने : ए भावड्या... गप बरं का! तुला काय करायचं? मी काय पण करीन. संज्या : काय पण करतीसच तू, काय ती कापडं तुझी, मेकप काय, शोभतं का तुला. सोनी : तुझं काय ? ते स्पाईक्स, ती अंडरपॅन्ट वरुन खाली गळणारी पॅन्ट, शर्टाची उघडी बटणं शोभतं का? पण मी काई म्हणते का तुला ! संज्या : दात काढून हातात दीन म्हणूनच बघ की. बरं मला काय ! काईपण बोलतात पोरं. सोनी : ती अशी तशी कशीही बोलतातच. आता आमच्या वर्गातली शीतल, लई हुशार. गॅदरींगला नाटक बसवतीय. कसली कडक असतीय, तरी तुझा तो बंड्या लाइन मारतो तिच्यावर,