पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेखिकेचे मनोगत मनोविकारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करताना तरुण पिढीशी ब-यापैकी संपर्क येतो. आजकाल वयात येणा-या मुलांना/मुलींना उपचारासाठी/समुपदेशनासाठी घेऊन येणा-या पालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अभ्यासामधील अडचणी, त्यामुळे येणारी निराशा, व्यवसनांच्या आहारी जाणे, आकर्षण, मैत्री व प्रेम याबद्दलचा गोंधळ. आईवडिलांचा मुलांशी संवाद नसणे, त्यातून होणारे गैरसमज अशा गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. या विषयांवर मुलांमुलींशी बोलणे होणे, त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचणे हे फार गरजेचे आहे. त्यांना कुतूहल वाटावे आणि लगेच समजावे अशा स्वरूपात त्यांच्यासमोर ही माहिती यायला हवी. योग्य माहिती हे संकट टाळण्याचे पहिले पाऊल आहे. म्हणूनच कॉमिक्सच्या आकृतिबंधात अत्यंत सोपेपणाने किशोरवयीन मुलांमुलींसाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही समोर येत आहोत. प्रतिसादाची खात्री आहे!.....* डॉ. राजश्री देशपांडे