पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सज्या शांत बसलेला नाना : संज्या, अरं काय रे, काय करतोयस इथं. संज्या : गप्प नाना : चल लेका घरी सगळे वाट बघतायत. संज्या : नको नको बाबा घरी येऊ नको म्हणालेत. नाना : बरं माझ्या घरी चल. नाना : माई, संज्या आलाय. जरा पाणी दे गं. माई : देव पावला! आलं का लेकरु! थांब, चहाच आणत्ये. लेकरा, का रं असा गेलास, तिकडं तुझ्या आईचा पाक जीव जायची वेळ आली. तुझ्या वडलांनी आत्तापर्यंत गावात वरखाली ४ तरी खेपा घातल्या असतील संज्या मुसमुसायला लागतो. माई : गप, डू नये. तुझी सोनी, भावड्या...भावड्या करतीय. असं डोक्यात राख घालून घिऊ नये. आरं, बोलला असलं बा रागात... आता पट्टदिशी घरला जा बरं.