पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | आई : अहो, जरा रिमोट ठेवा खाली. मी काय म्हणतेय? बाबा : बोल तू. आई : संज्या, गणितात फेल झालाय पुन्हा. म्हणतोय डोक्यातच शिरंना. सर काय शिकवत्यात ते. बाबा : थांब, येऊ दे त्याला घरी. बघतोच. गावभर उंडरायचं, घाणेरड्या सवयी, टवाळ दोस्त. आई : अहो, घरीच आहे. मागच्या महिन्यात त्या बंड्याच ‘तसं' झाल्यापासून एकदम लायनीत राहतोय सध्या. अभ्यासाला लागलाय बाबा : तू कड घेऊ नको. आई : मी कशाला कड घेऊ, बाकीच्या विषयातले मार्क सुधारलेत त्याचे. भटकायचा कमी आलाय, एखाद काम लगेच ऐकतोय । बाबा : बोलाव बरं त्याला आई : हे बघा नीट बोला त्याच्याशी. पोरगं लईच नर्वस हाय. काल लई रडलाय. म्हणत होतं, “आई, आता मी क्लासला नीट जातो. शाळेचे तास बुडवत नाही, तरी मी नापास झालो. बाबा : तुला ज्यादा पुळका आलाय. दोन कानाखाली वाजवल्याकी चट सगळी गणित सुटतील.