पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

EMERGENU डॉ. : घेताना कळत नाही का रे तुम्हाला? पोर : खरंच माहिती नव्हतं. संज्या : त्यात काय झालं, मला मी मर्द आहे ते दाखवायचं होतं, हे बायल्या म्हणतात मला. डॉक्टर : हो, मग आता त्या हिशोबानं बंड्या ‘एकदम मर्दपुरूष' होय ना. पोरं : (गांगरुन) नाही.. नाही.. डॉक्टर : हे बघा, पोरांनो मर्द होणं, पुरुष होण म्हणजे काय? तुमची उंची वाढू लागते, आवाज बदलतो, काखेत गुप्तांगावर केस येतात, धातू सांडू लागतो. हे सगळं अचानक होत का? हळूहळू होतं आणि प्रत्येकाचे वाढीचे टप्पे वेगवेगळे असतात. १२ ते १९ वर्षे वयात कधीपण हे बदल घडतात. तुम्ही । १४-१५ चे आहात. किती घाई झालीय तुम्हाला मर्द बनायची!