पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉ. : पैसे वगैरे काही उचलले का? बाबा : तुम्हाला कसं कळलं डॉक्टर? त्यांन मागच्या. महिन्यात जवळजवळ हजारभर तरी रुपये उचलले असतील आणि हो मी झडती घेतली त्याच्या खोलीची कालच, तर मला ही पुडी सापडली. डॉ. : मला शंका आलीच होती. अहो, हा गांजा आहे. तुमच्या मुलाला हा त्रास या व्यसनामुळे होतोय. कधीपासून चालू आहे हे व्यसन? बाबा : काय माहित? काय रे पोरांनो, कधीपासून घेतोय हा? संज्या- अक्ष्या (ततपप) झाले असतील ३ महिने... आपलं ६ महिने. नाना : काय रे, मुलांनो तुम्ही पण घेता ना! मी पाहिलंय तुम्हाला तिघांना बिडी पित बसलेले. संज्या-अक्षा - हो म्हणजे कधी... संज्या : मी नव्हतो घेत पण मला याच दोघांनी आग्रह केला. या बंड्यानीच मला 'बायल्या, नं.६' असं चिडवलं. घेत नाही तू, बायल्या असं म्हणाल्यावर मी वैतागून घ्यायला सुरुवात केली.