८५
ईल, ह्मणजे या पक्षी पंत्रापट कमी होईल. परंतु हैं वजन पंध्रापट जड आहे, यामुळे वरचा उदाहरणांत सिद्ध केल्यावरून तें पंध्रापट हळू चालेल.
यंत्राचा गणितरूप विचारांत, त्याचे अवयव, घर्षण व्यतिरिक्त आणि केवळ ताठ आहेत असें कल्पिले असतें, आणि त्यांचा आंगीं वजन अथवा जडता हीं नाहींत असेंही मानिलें असतें. दोर आणि दोऱ्या अ- गदीं नरम आहेत असे कल्पितात; आणि जेव्हां यंत्र चालतें, तेव्हां त्यास हवेपासून कांहीं प्रतिबंध होत नाहीं असें मानावें लागतें. यंत्राची योजना कशी करावी हैं समजण्यासाठीं या पुढील चार वस्तूंचा वि चार केला पाहिजे; प्रथम, जो कांहीं भार किंवा वजन उचलावयाचें असतें तें; दुसरी, त्या भारास किंवा वजनास उचलून धरणारी जी मनुष्य, घोडा अथवा वाफ इत्यादिकांची शक्ति कामांत घेतात तो; तिसरी, आधार अथवा टेंकू; चवथी, उचलायाचें वजन किंवा भार, आणि शक्ति यांचे वेग. जें वजन उचलायाचें असतें त्यास उच्चाल्यवजन असें ह्मणतात; आणि जी शक्ति त्या वजनास तोलून धरित्ये तीस उच्चालकशक्ति असें ह्मणतात.
१ उच्चालक.
२ कप्पी अथवा दोरी.
कांहीं ग्रंथकर्त्यांनीं यांस मुख्य मूळयंत्रे असें ह्यटलें