Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
गुरुत्वमध्य.

आकृति ४७. वर्तुळाचा मध्य व आहे, त्या वर्तुळा- चा भागांतून त्याचा गुरुत्वमध्य चा- लतो, आणि ब बिंदूवरचा लंबाबा- हेर जेव्हां गुरुत्वमध्य जातो तेव्हां तो तुकडा आपल्या वजनानेच पडतो. शंकूचा आकारावरून ही गोष्ट सहज दिसून येईल, ब अ क ( आकृति ४८ ) भाकृति ४८. एक शंकू आहे, त्याचा गु- भ क रुत्वमध्य ग, फार नीच आहे, आणि त्याचा पायाही फार रुंद आहे, ह्मणून तो उल- टून टाकण्याचा पूर्वी त्याचें पुष्कळ वजन उचलिलें पा- हिजे, कारण कीं ब बाजूवरून उलटण्यास त्याचा गुरुत्व- मध्यास ग इ कौंसांतून नेलें पाहिजे आणि तसे केल्यानें तो गुरुत्वमध्य ह इ उंचींतून उचलिला जातो. जर कदाचित् तो शंकू उंच असला आणि त्याचा पाया अरुंद असला, तर ह इ उंची तशाच प्रमाणानें कमी हो ईल, यामुळे तो सहज उलटितां येईल; यावरून पूर्वी लि- हिल्याप्रमाणें पदार्थाचा दिग्रेषेचे स्थान जसें असेल आणि पदार्थ उलटण्याचा पूर्वी त्याचा गुरुत्वमध्य किती उंच चढवावा लागेल, त्याप्रमाणे त्याची बैठक मजबूद होईल.-

 चौरस, समांतर बाजू चौकोन, वर्तुळे इत्यादि आ- कृति जेव्हां सारिख्या जाडीचा असतात तेव्हां त्यां- चा गुरुत्वमध्याचें स्थान सहज काढितां येतें जा बिंदु- भोंवतीं पदार्थाचा प्रकृतीची रचना सारिखी असत्ये,