Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वक्र रेषा चलन.

६१

हाताची अथवा दारूची शक्ति हवेचा प्रतिबंधामुळे उत्तरोत्तर क्षीण होत जात्ये, आणि गुरुत्वाविषयींचा अध्यायांत सांगितल्याप्रमाणें जर पदार्थाचा आंगीं पड- तांना वेग वाढत जातो तसा न वाढता, तर त्या गोळ्यावर अथवा दगडावर गुरुत्वप्रेरणा सारिखीच घडती; आणि यावरून असा सारांश निघतो कीं, सर्व पक्षी या दोन प्रेरणा मिळून त्यांची एक प्रेरणा होत्ये, जिर्णेकरून पदार्थाचा चलनमार्ग वक्र होतो.

 बाजूवरील आकृतींत अ एक गोळा नुकताच तोफेतून निघालेला आहे, तर जादिशेत गुरुत्वप्रे- रणा त्यास खालीं ओढित्ये ती दिशा अब रेघ दाख- आकृति 39. अ क डफा प ग५ र वित्ये, आणि त्यास दारू पुढे प्रेरित्ये ती दिशा अ क रेघ दाखवित्ये, अशा या दोन प्रेरणा परस्परांशीं विरुद्ध असून त्या गोळ्यावर घडतात; परंतु जर अशी कल्प- ना केली कीं अ पासून क पर्यंत गुरुत्वप्रेरणेपेक्षां दा- रूचा जोर अधिक आहे, आणि त्यामुळे गुरुत्वप्रेरणेचा व्यापार, त्या स्थळांत दिसून येत नाहीं, तर तो गोळा पुष्कळ लांबपर्यंत सरळरेषेत जाईल. परंतु गुरुत्वप्रेरणा अचल आहे ह्मणून, अशी कल्पना करितां येईल कीं जेव्हां गोळा क जवळ येतो, तेव्हां गोळ्या- वरील प्रेरणा इतकी कमी होत्ये की तिचानें त्या गो- ळ्यास खालीं येण्यास अडथळा करवत नाहीं; ह्मणून