Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तृतीय चलन नियम.

३१

षेत चालेल; आणि “ त्याचे गमनाचा फेर, या प्रेरणे- शीं प्रमाणांत होईल.” विद्यार्थ्यास गुरुलनियमांची माहिति झाल्यावांचून प्रोजेक्टाईल (ह्मणजे तोफा मा रण्याची विद्या) तिचे नियम पुरतेपणीं समजणार ना- हीत; ते गुरुत्वनियम पुढे एका अध्यायांत वर्णिले आहेत.

तृतीयचलन नियम.

 आघात, नेहमी प्रत्याघाताचा बरोबर आणि विरुद्ध असतो; अथवा दोन पदार्थांचे परस्परां - वरचे आवान समान असतात, आणि त्यांचा दिशा समोरासमोर असतात.

 जेव्हां दोन चलनविशिष्ट पदार्थांतून एक दुस- यावर आपटतो, अथवा एकाचा आंगीं चलन असून तो दुसऱ्या स्थिर पदार्थावर आपटतो, या दोहों पक्षों- चा धक्का दोघांसही समान लागतो; जसें जर एक मनुष्य धांवत धांवत दुसऱ्या स्थिर राहिलेल्ये मनुष्याचा आंगावर जाऊन पडतो, तर प्रत्येकासही धक्का लागतो; परंतु जर ते दोघे समान वेगाने आणि समोरासमो- रून धांवत येऊन परस्परांवर आपटतात, तर पूर्वीपेक्षां धक्का दुप्पट होईल. जर त्यांतून एकाचें वजन दुस- =यापेक्षां फारच कमी असले, तर त्यास या कारणामुळे भारी वजनाचे मनुष्यापेक्षां अधिक धक्का प्राप्त होणार नाहीं, परंतु त्यांतून हलका मनुष्य जरीं पडला आणि दुसरा पडेसा झाला तरी प्रत्येकास जो धक्का लागतो