२९
संयोगाने त्याची उडी सिद्धीस जाये, ह्मणजे तो पुनः त्याच भरधाव चालणाऱ्या घोड्यावर येऊन बसतो. या प्रसंगीं त्याचें शरीर एका समांतर चौकोनाचा कर्णावरून चालतें, जा चौकोनाची एक बाजू, घो ड्याचा चलनाची दिशा आहे, आणि दुसरी बाजू मनुष्याचा उडीची दिशा आहे.
यंत्रशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यानें, प्रेरणांचे एकी- करण आणि पृथक्करण यांचा मूळ कारणांशीं परते- पणीं माहित असावें हैं आवश्यक आहे, कां कीं कोण- त्याही दिशेत अवांतर प्रेरणा लागू झालेल्या पदार्थ- विषयींचीं कृत्यें उलगडणे यांवांचून होत नाहीं. जा शास्त्रांत तोफा मारण्याची विद्या सांगितली आहे, त्या शास्त्रास या कारणाचा आधार आहे; सर्व पदार्थ को- णत्याही प्रेरणेनें पृथ्वीचा सपाटीजवळ सरळ रेषेत फें- कले असतां, त्यांजवर पृथ्वीचें आकर्षण निरंतर असतें त्या योगानें त्यांचा सरळ चलनाची दिशा फिरून, ते वक्र रेषेनें पृथ्वीकडे येतात. याच मूळकारणाचा आधाराने सर ऐसाक न्यूटन याणे आपल्या प्रिन्सीपि- या या ग्रंथांत जगताचा खरे स्थितीविषयीं सिद्धांत केला आहे, आणि अंतरिक्षजडांचा योजना, व त्या योजनांचा निरंतरपणा, आणि त्यांचे परस्परांवर आ- कर्षणादि व्यापार आणि परिणाम या सर्व गोष्टी जा नियमांनी घडतात, ते नियमही त्याणे शोधून काढले आहेत. मूळ यंत्रांचीं लक्षणें आणि गुण यांची सि-