बाजूंशी प्रमाणांत होतील. यावरून व अ ला वड, अथवा वअ ला अक, अथवा अक ला अब व्याप्र- माणें शक्ति व वजनास होईल. उदाहरण, जर उत- रणीची उंची १ फूट, आणि तिची लांबी २० फुटी आहे, तर त्या उतरणीवर २० शेरांचे वजन १ शेराचा शक्तीनें तोलून धरितां येईल.
वरचा सर्व लेखांत शक्ति वजनास तोलून किंवा उचलून धरित्ये असें जेथें येईल, त्याचा अर्थ · वजना- चा सर्व भार शक्तीवर पडतो, असा करूं नये, परंतु शक्ति वजनास उतरणीवरून खालीं गडबड देत नाहीं असें समजावें. शक्ति आणि उतरण ही यथांशेंकरून सर्व वजनास तोलून धरितात; आणि उतरणीचा यो- गानें वजनाचा जितका भाग
शक्तीचा वांठ्यांतून कमी होतो. संभाळिला जातो, तो उतरणीचा उतारा- चा कोन जितका कमी असेल, तितकें थोडें वजन शक्तीस उचलावें लागेल, आणि उतरणीचा वांट्यास अधिक येईल; आणि याचा उलटेंही घडेल.
जेव्हां एक पदार्थ उतरणीवरून लोटीत नेतात, तेव्हां घर्षण आणि त्या पदार्थाचें गुरुत्व यांचा अतिक्रम करावा लागतो; कारण गुरुत्वाचा योगानें पदार्थ अति नीच स्थळीं येऊ लागतो, पण सरळरेषेत पृथ्वीचा सपाटीकडे येण्यास त्यास उतरण प्रतिबंध करिये. गुरुत्वाचें विव- रण करित्ये समयीं (४७) व्या पत्रांत सांगितले आहे, कीं पदार्थ आपल्या गुरुत्वाचा योगानें पडून पृथ्वीचा सपाटीकडे येऊ लागला असतां, पहिल्या सेकंदांत