Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय १०.
उतरण.

 सर्व मूळ यंत्रांत उतरण है एक फार साधे यंत्र आहे; त्यांतील मुख्य अवयव एक सपाटी, ती केवळ कठीण अशी कल्पिलेली असत्ये, आणि क्षितीमर्या- देचा सपाटीशीं ती सपाटी कोन करिये. त्या सपा- टीचा उतार क्षिति मर्यादरेषे जवळ जवळ किंवा उभ्या चढावा सारिखा असतो - जेव्हां मोठेसें पिंप गा- डींत चढवायाचें असतें, आणि जेव्हां चढविणाऱ्या मनु- ष्याचा शक्तीपेक्षां तें जड असतें, तेव्हां तो एक बळ- कट फळें घेऊन त्याचें एक टोंक गाडीवर टेंकून दु- सरें टोंक जमिनीवर ठेवितो; आणि अशा तऱ्हेनें उत रण तयार करून तिचा उपयोग करितो; नंतर तो मनुष्य त्या फळ्यावरून तें पिंप लोटीत लोटीत शेवटीं गाडींत टाकितो. ही उतरण जितकी लहान असेल तितका तिचा चढाव अधिक होईल. आणि तीच उतरण जितकी लांब असेल त्याप्रमाणे तिचा चढाव सोपा होईल हैं उघड आहे. जा टेंकडीचा चढाव केवळ उभा असतो, तिचावर ओझें चढविण्यापेक्षां, जी टेकडी थोड्या चढावाची असत्ये, तिजवर ओझें लोटीत नेण्यास फार सोपें पडतें, ही गोष्ट अनुभवावरून सम- जये. - मनांत आण कीं एक पिंप ५०० शेर वजनाचे आहे; आणि जर कोणत्याही यंत्राचा उपयोग केला