Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चरकप्प्यांचे संयोग.

१६७

दोरीचा दुसऱ्या टोकास प शक्ति लागू केली आहे. या पक्षांत प, अक, कड यांतून प्रत्येक दोरीवर प शक्ति इतका भार आहे; आणि अब, ब क यांतून प्रत्येक दोरी प शक्तीचा दुप्पट भार उचलले; आणि डक, कब, कअ, या दोऱ्यांवरचा भारास प्रतिबद्धक व वजन होते यावरून ते प चा चौपट असावे.


कप्प्यांचे रचनेची शक्ति हवी तितकी वाढवितां येईल, अशा तऱ्हेने अनेक चरकप्प्यांची योजना क- आकृति ११९. रितां येईल; बाजूवरील ११९ व्या आकृतींत एक कप्प्यांची योजना दाखविली आहे, आणि तिला तीन दोर आहेत, आ- णि त्यांत शक्तीचा आठपट वजन आहे. पहिल्या दोरीचा शेवटास ४ शेरांची शक्ति टां- गली आहे. ह्या दोरीवर १ ही खूण केली आहे. आणि ती अ कप्पीखालून नेली आहे, आणि प्रत्येक दोरावर ४ शेरांचा मार आहे,यावरून तेथें ८ शेरांचें वजन उचलितां येईल. दुसऱ्या दोरा- वर २ हा अंक मांडला आहे, तो ब चरकप्पीखालून जातो. यावरून तो १६ शेरांचे वजन उचलील, ह्मणजे एक एक बाजूस ८ शेरांचा भार पडतो. बाकीचा तिसऱ्या दोरावर ३ हा अंक मांडला आहे, आणि तो क चरकप्पीखालून जातो, यामुळे त्याचा प्रत्येक बा-