Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
एक दोराचा कप्प्यांचे संयोग.

लागले अथवा वजन किती कमी होईल, याची गणना करण्यासाठीं चरकप्प्यांची संख्या दोहोंनीं गुणावी ह्म- णजे तो गुणाकार इच्छिली यंत्राची शक्ति होईल. उदाहरण, दोन चरकप्प्यांस दोन दोऱ्यांनीं गुणिलें असतां गुणाकार चार होतो; यामुळे जी शक्ति लावावी लागेल ती वजनाचा चतुर्थांशा बरोबर होईल, आणि याप्रमाणे पुढेही.

आकृति ११२. क ग फ  ११२ व्या आकृतीत दुसरी एक कप्प्यांची रचना दाखविली आहे, त्यांत केवळ एक दोर आहे. त्यांत खालचा जोडास् वजन टांगलें असतें, आणि तो चर आहे, त्यास वड, आ णि फ, अशीं तीन चाके आहेत. बरचा जोड अचर आहे, आणि त्यास अ, क, आणि इ, अशीं तीन चाकें आहेत, आणि दोराचें टोंक ग अंक- ड्यास बांधून, अनुक्रमाने खालचा आणि वरचा चाकांतून नेऊन, शेवटी वरचा शेवटील चाकावरून काढून त्यास शक्ति बांधितात. जा सर्व दोऱ्या खालचा जो- डांतून जातात, त्या वजनास उचलून धरितात; आणि त्यांस ताणणारी शक्ति सारखीच असत्ये, यामुळे वज- नाचा व्यापार सबींवर सारखा वांटला जातो. यावरून खालचा जोडास उचलून धरणारी जी दोऱ्यांची संख्या असेल, तितक्यापट शक्तिपेक्षां वजन मोठे असावें