Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चरकप्प्या.

१५९

अर्ध वजनाइतक्या प्रेरणेनें वजन त्यांतून प्रत्येकीस ओ- ढितें; आणि त्याच दोन्यांस दुसऱ्या बाजूस, शक्ति आ णि स्थिरबिंदु हेही अर्थ वजना इतक्या प्रेरणेनें ओ- ढितात; यावरून त्या सारख्या प्रेरणांनी ताणल्या भ- सतात, ह्मणून त्या सारख्या तागल्या जातात. या प- क्षांत वजनाचें जें अर्ध घडतें तो चरकप्पीपासून य- त्रिक स्वार्थ होतो असें जाणावें; उदाहरण, जर वजन १२ शेर आहे, तर त्यांतील ६ शेर १०७ व्या आ- कृतीप्रमाणें अस्थिर बिंदूनें उचलिले जातील, आणि बाकीचे ६ शेर प शक्तीनें उचलिले जातील. -

 अ ब आणि व क दोन्या उभ्या असतात, त्या तशा न- आकृति १०९. सतां, जर बाजूवरील (१०९) व्या आकृतीत दाखविल्या प्रमाणे तिर्कस असल्या, तर वजन उचलून धरण्याकरि तां वजनाचा अर्धपेक्षां अ- क फ ड धिक शक्ति असावी. यापक्षीं कांहीं वजन उचलून धरण्यास जी शक्ति पाहिजे, तिचा परिमाणाचा नि- श्चय ठरविण्यासाठी १४व्या पृष्ठावर प्रेरणैकीकरण आणि प्रेरणा पृथकरण यांचे कारण समजावून दाखविलें आहे, तें येथें लागू केलें पाहिजे; तर पहिल्यानें वजनांत जि- तके तोळे असतील तितक्या इंचांची व बिंदूपासून एक उभी रेघ काढ, मनांत आण कीं तो रेघ फ पर्यंत जाये, नंतर फ पासून फ ड रेघ अब शीं समांतर