तो; ह्मणून दोन तोळे वजनाचे स्थिर गोळ्यास कां हीं वेग देण्यास जो प्रेरणा पाहिजे, तिजपेक्षां पांचपट प्रेरणा दहा तोळे वजनाचे गोळ्यास तितकाच वेग आणायास पाहिजे. जरी त्या दोन गोळ्यांचे वेग सा- रिखे आहेत, तरी लहान गोळ्यापेक्षां मोठा गोळा पां- चपट अधिक शक्तीने चालतो; परंतु जर लहान गो- ळ्याचा वेग पांचपट वाढविला, तर त्या दोघांचा वेगा- 'घात अथवा चलनसंचय हीं बरोबर होतील; ह्मणजे एकानें दहा गुणिले इतका वेगाघात लहानाचा आहे, आणि दुसन्याचा, दोन गुणिले पांचांनी इतक्याबरो- वर आहे. ह्मणून कांहीं वेगाने जाणारे पदार्थाचें वजन वाढविल्याने, अथवा वजन न वाढवितां त्याचा वेग वाढविल्याने त्या पदार्थाचा वेगाघात अथवा चलनसं- श्चय हीं वाढवितां येतील; असा निश्चय होतो; यास उदाहरण, जर एक मनुष्य पन्नास शेरांचें वजन कांहीं वेगाने आपले पासून दहा हातांवर उडवितो, तर शंभर शेर वजन तितकेंच लांब उडवायास, अथवा मूळचें पन्नास शेर वजन कायम राखून दुप्पट लांब उडवायास पहिले- पेक्षां दुप्पट वेग दिला पाहिजे. परंतु जर तो पहिल्या- पेक्षां अधिक प्रेरणा न देईल, तर शंभर शेरांचें वजन पांच हात मात्र लांब जाईल, त्या पक्षीं या दोन वजनांचा वेगाघात बरोबर होईल, कारण ५०x१० = १००×५. यावरून जर कोणत्याही परिमाणाचा दोन पदा- थींचे वेग त्यांचे प्रकृतिपरिमाणांशीं उलटे प्रमाणांत आहेत;— ह्मणजे, लहान पदार्थ मोठ्ये पदार्थाहून
पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८
बेगाघात - दृष्टांत.