Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माहितगारीचे दृष्टांत.

१०७

टांगून नेतात ते. या उदाहरणांस आधार एकच आहे, कारण पुढील किंवा मागील मनुष्य टेकूस्थानी कल्पून बाकीचा दुसरा मनुष्य शक्तीचे ठिकाणी आहे असे मानावें. जर ओझें काठीचा मध्यभागी असले तर प्रत्येक मनुष्यावर बरोबर अर्धा भार पडेल; परंतु 'जर तें एकापेक्षां दुसऱ्याचा जवळ असले तर, जाचा खांद्यावर लांब टोंक असतें त्यापेक्षां जाचा खांद्यावर तोकडें टोंक असतें, त्यास अधिक भार उचलावा ला- गेल. मनांत आण कीं, ओझाचे वजन तीन मण आहे; आणि काठीवर जा ठिकाणीं तें ओझें टांगले आहे, तें ठिकाण पहिल्याचा खांद्यापासून ३ फुटींवर, आणि दुसऱ्याचा खांद्यापासून ६ फुटींवर आहे; तर दुस- यस जितका भार सोसावा लागेल, त्याचे दुप्पट भार पहिल्यास सोसावा लागेल; ह्मणजे पहिल्यास २ मण उचलावे लागतील, आणि दुसऱ्यास १ मण उचला- वा लागेल; कारण २ आणि ३ यांचा गुणाकार १ आणि ६ यांचा गुणाकारा बरोबर आहे.


 मोठा सामानाचा गठ्ठा उचलायाचे वेळेस एक लांब उच्चालक घेऊन त्याचें एक टोंक जमीनीवर ठेवून आकृति ६८. दुसरें हाताने वर उचलतात, तें या उच्चालकाचें दुसरें उदाहरण आहे. त्याची बाजूवर आकृति आहे, या ६८ वे आकृतींत ज- "मीन हाकू, हाताचे जोर ही शक्ति, आणि गठ्या हैं वजन आहे.