उच्चालकाचा दोन्ही बाजू बरोबर असतील, अ- थवा शब्द भेदानें ह्यटलें असतां, जर उच्चालकशक्ति आणि उच्चाल्यवजन यांचा बरोबर मध्यभागी टेंकू अ- सेल, तर कांहीं खार्थ होणार नाहीं; कां कीं त्यांचे खाली वर होणें एकाच काळांत आणि समान स्थळां- तून होते; आणि जेव्हां शक्ति प्राप्त होये तेव्हां काळ अधिक लागतो असें वर सांगितलें ; परंतु या पक्षीं वेळेचा तोटा झाला नाहीं यामुळे शक्तीचाही नफा झाला नाहीं. कापायाची कातर ह्मणजे वर सांगि- तलेल्या जातीचे २ दोन उच्चालक एका खिळ्याचा योगानें जोडिलेले असतात; जो खिळा त्यांस एकत्र जोडितो, तो त्या उच्चालकांचा टेंकू आहे; जा बो- टांनी कातर धरिली असत्ये तो बोटें उच्चालक- शक्ति स्थानी आहेत; आणि जो पदार्थ कापायाचा असतो तो उच्चाल्यवजन अथवा प्रतिबंध असतो ; यावरून कातरीचे दांडे जितके लांब असतील, आणि तिचीं टोंके जितकीं तोकडी असतील, त्याप्र- माणे कोणताही पदार्थ सहज कापितां येईल. दि- व्याची कोजळी कापायाची कातर आणि पुष्कळ जातीचे चिमटे वरचा जातीचीं उदाहरणें आहेत. त्यांत मागल्या बाजूपेक्षां पुढली बाजू जितकी लहान असत्ये तितके त्यांचें सामर्थ्य अधिक असतें. -
पदार्थ तोलावयाची तराजू एक उच्चालक आहे; आणि जा बिंदूवर तराजूची दांडी राहत्ये तो बिंदु उच्चालकाचा टेंकू आहे, आणि परड्यांतील वजने दोन