पान:मृच्छकटिक.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर ४१ कल्पना कुंठित जाहाली. श्रीराम अयोध्यापूर सोडून वनवासास जावयास सिद्ध जाहाले, तें वर्तमान ऐकतांच दशरथाने कैकेयीच्या मंदिरांत अंतधति केले, तसेच भाऊसाहेबांस जाहाले. तेव्हां मल्हारजी होळकर यांस आज्ञा जाहाली की, 'तुम्हीं पुण्यास जावें. बरोवर आमचे कुटुंब व इतरांचे कविले घेऊन जाऊन, श्रीमंत नानासाहेबांस व श्रीमंत सौभाग्यवती चोपिकाबाईसाहेब यांस माझे साष्टांग नमस्कार सांगून विज्ञापना माझ्या तर्फेने करावी. * तुमचे चिरंजीव विश्वासराव साहेब व भाऊसाहेव तीन लक्ष सेनेसहित इंद्रलोकीं सुखरूप आहेत, कांहीं चिंता न करावी. उभयतां वडिलांनी आजपासून लोभ चिरंजीव माधवरावसाहेबांवर करीत जावा पुढे कांहीं दिवसांनी त्यांचे हातून संपूर्ण शत्रू लयास जाणार. मी परशुरामअवतार आणि चिरंजीव माधवरावसाहेब केवळ अर्जुनाचा अवतार. आमचा संकल्प यांचे पराक्रमाने परिपूर्ण होणार. याप्रमाणे सांगितलेले वर्तमान नानासाहेबांस व सौभाग्यवती वहिनीबाईंस श्रुत करावे. कदाचित् शत्रूनीं तुमचा पिच्छा पुरविला असतां आमच्या कुटुंबाचा शिरच्छेद तुम्ही आपलें हातीं करावा, परंतु शत्रूचे हातीं जिवंत लागू देऊ नये." तसेच जनकोजी शिंदे यांस सदहू अन्वये निरोपण जाहालें. शिंदे मजकूर यांणीं उत्तर केलें कीं, 4 मी पुण्यास माघारा जावयाचा नाहीं. खावंद जर माघारे पुण्यास येतील तर मी जाईन. नाहीं तर मी जेथे खावंदाचा जोडा पडेल तेथे माझे शिरकमल पडेल ! यांत तिळमात्र अंतर नाहीं. ते ऐकून समागमें स्वारीवरोबर गंगोदकाच्या कुप्या चालत होत्या त्या सदाशिवपंत भाऊंनी आणवून, खालीं गाशा3 घालन शेलापागोटे, जामानिमा ४ ढालतलवार सुद्धा सचैल स्नान करून एके कुपीचे उदक प्राशन केले आणि उत्तर केलें कीं, “आमचे पारणे जाहालें !' मग मल्हारराव होळकर यांस रामराम करून " आतां लोभ असों द्यावा." असे बोलोन हयपान घोडा अर्थी होता, तो आणवून, वर स्वार जाहाले. एवढ्यांत होळकर वगैरे याँणीं विनंती केली की, “एवढे हट्टास पडावयाचे - (१) नागपूर प्रत-* कलम'- म्हणजे लेखणी. (२) ‘व श्रीमंत .. साष्टांग' हे शब्द पुणे प्रत १ व भिवंडी प्रत यात नाहीत. (३) गाशाखोगीरावरची पातळ गादी. (४) जामानिमा-सर्व पोषाख.