पान:मृच्छकटिक.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ रघुनाथ यादव-विरचित जाऊन समाचार घ्यावा, याप्रमाणे पंथ चालविला, व जखमा ब-या झाल्या त्या शिपायांस पाणी घालून, नवीन बक्षिसे देऊन, संतोष करून हुशार केले. २३. दाणा वैरणीकरता फिकीर परंतु दाणावैरणीकरितां पेशवे बहादूर मोठ्या फिकिरांत पडले. लष्कराभोंवतीं दोनों कोस उजाडीं पडली. उपाय चालेनासा जाहाला. शत्रूच्या लष्करांत यमुने पलीकडून हर जिन्नस येत होता. कांहीं तोटा नव्हता. सदाशिवपंत भाऊंस मात्र मोठे संकट पडले. त्याकाळीं गोविंदपत बुंदेले मामलेदार प्रांत सागर निसबत पंतप्रधान यांनी खजिना व दाणा मरून समागमें फौज रखवालीस पंधरा हजार घेऊन खाविदाचे कुमकेस जावे असा सिद्धांत करून निघाले. ही बातमी शत्रूच्या लष्करांत दाखल होतांच पाळथ राखून, शास्तेखां१ जुलपुकरखां हे दोघे सरदार पाठवून, यमुनापार होऊन सूर्योदयाचे समयीं एक रात्रींतून चाळीस कोस येऊन छापा घातला. तेथे मोठी लढाई झाली. परंतु बुंदेले यांजकडील फौज बेसावध होती याजमुळे गिलचाने लढाई देऊन पंत मशारनिल्हेचे शीर कांपून नेले, आणि ताटांत घालून भाऊ साहेबांकडे नजर पाठविले. त्याचे वर्तमान असलें वाईटपणाचे भाऊंनीं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून केवळ कंबरच बसली. चंदेले यांची स्त्री समागमेंच होती तिने प्रेताबरोवर सहगमन केले. आणि दिवसेंदिवस अन्न मिळेनासे जाहलें. चार चार फांके पडू लागले. घोड्यांस. दाणा वैरण अगदींच मिळेनाशी झाली. मग महर्गतेची वार्ता त्यांणीं श्रवण करून सलूखाची वार्ता व युद्धाची तयारी करणे ही गोष्ट अगदीच टाकिली. चलबिचल न करितां थंड राहिले. भाऊसाहेब मोठ्या संकटांत पडले, तीन उपोषणे सारे लष्करास घोड्यामाणसासुद्धा पडलीं. २४. ‘ या हट्टाने सर्व लयास गेले. कांही आहे तेंही जाणार. तेव्हां मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे व माजी गायकवाड व यशवंतराव पवार व अंताजी माणकेश्वर व संताजी अटोळे वगैरे लहान थोर मिळून सदाशिवपंतांपाशीं विचार करावयास आले. तों सदाशिवपंत भाऊ व (१) ही नांवे चुकली आहेत. अताईखान व करीमदादखान यांना पाठविले होते. (२) फाक-उपास (३) त्यांणीं-शत्रूने. क.: ।