पान:मृच्छकटिक.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर २३ शिवदेव व फकीर महंमद व फिरंगोजी पवार व राणोजी जाधवराव, अण्णाजी जाधवराव व धर्माजी पासलकर व संताजी आटोळे व नरसोजी खैरात व हैबतराव साळसकर व सयाजी पायघुडे व नरसाजी बिरजे व गुणाजी भापकर व लिगोजी केशव व सदाशिव अप्पाजी व जानमहंमद व भागोजी डफळे व इंद्रोजी रसगळ व रस्तुमराव पांढरे व इंद्रोजी कदम व बळवंतराव सासवडकर या सर्वांनी घोड्याखाली उड्या टाकून पायउतारा' झाले. मागे पुढे पाहिलेच नाहीं. तेथे मारामारी कांहीं सामान्य जाहाली नाही, ते समयीं स्वर्गी इंद्रलोकींचे इंद्र सुद्धां सुरगण विमानांत बसून अंतराळीं पाहावयास आले. धन्य त्या वीरश्रीवैभवाची ! बळवंतराव यांचा मुर्दा बळजोरीने सदाशिवपंतांनी आपले जमातींत आणिला. मर्दुमकीचा वहमारे इराणीचा जिरला. त्या सपाट्यांत सदाशिवपंत भाऊंकडील व इराणीकडील व दिल्लीपत बादशाहाकडील व सुजातदौले व मनसूरअली व हस्तनापूरवासी यांजकडील खांसा खांसा मोहोरा, एका ताटांतील जेवणारा, साडेसातशें कामास आला. यांणी3 इराणी दुराणीचा मोहोरम केला. वरांच्या मर्दमीचा कळस जाहला ! एवढी लढाई जाहली. परंतु काही तफावत पडली नाहीं! याजकरितां इराणी दुराणी अंतरीं दिलगीर होऊन म्हणू लागले की, " दखनी मराठे लोक बडे हामजादे ! तरवारीस आपणास ऐकत नाहींत. बादशाही लियाबिगर हं बी पीछे जानेके नहीं. सब सलतनत५ समेत हक्क होना ये अच्छा." असे म्हणोन फिरून चालून येण्याची उमेद धरावी तों एवढ्यांत सदाशिवपंतानी कुतरतोड करून सर्वं शत्रुस आपल्या लष्करांत शर्त बेशर्त करून दामटून घातले. (१) पायउतारा होणे-पायांनी चालणे. पुणे प्रत १ व भिवंडी प्रत* पायउतारा होऊन मोठे नेटाची तरवार करून जवामने पंत मशारनिल्हेचे प्रेत बाहेर काढून आपले जमातींत आणिले. वीरश्रीवैभवाची शर्त झाली " असे आहे.(२) वहमा-वहीम, शंका. (३) यांणी-मराठ्यांनी. (४) मोहोरमकत्तल. (५) सलतनत-राज्य किंवा फौज. (६) हक्क होणे-मरणे. (७) कुतरतोड-त्रेधा, घाई (८) शर्तबेशर्त-परिश्रम. (९) दामटून घातलेपिटाळले. 11-4|।।